Political activists rejected help to needy people cause they are not voter in pune 
पुणे

माणुसकीला काळीमा ! मतदार नाही म्हणून कार्यकर्त्यांनी नाकारली मदत

सकाळवृत्तसेवा

पुणे : 'कोरोना'च्या संकटात सर्व भेद विसरून गरीबांना मदत करा असे आवाहन केले जात आहे. मात्र, बालेवाडी परिसरातील एका राजकीय व्यक्तीच्या कार्यकर्त्यांनी केवळ आपले मतदार नाहीत म्हणून गरीब कष्टकऱ्यांना मदत नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे.
 
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
'कोरोना'मुळे लाॅकडाऊन करण्यात आले आहे. कष्टकरी, मजूर गरीबांच्या हाताला काम नसल्याने ते पुढचे काही आठवडे कसा उदरनिर्वाह करायचा हा प्रश्न त्यांना पडला आहे. शहरात सामजिक संस्था संघटना मदत करत असल्या  तरी अद्याप अनेक जण उपेक्षीत आहेत. 

पिंपरीतील पाॅझिटिव्ह संख्या 35; एकाच दिवशी आढळले सहा रुग्ण
पुण्यात राजकीय लोक ही गरीबांना मदत करण्यासाठी सरसावले आहेत, पण यात मतदार आणि बाहेरचे असा भेदभाव सुरू आहे. रविवारी बालेवाडी परिसरात एका राजकीय व्यक्तीने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गरीबांना धान्य वाटप सुरू केले.

शिक्षणमंत्री म्हणतात, परीक्षा रद्द; अन् हे मुख्याध्यापक म्हणतात, परीक्षा घेणारच!​
एका वस्ती वर गेले असता तेथे काही पश्चिम महाराष्ट्रातील मजूर तर काही परप्रांतीय मजूर रांगेत थांबले, पण त्यांच्याकडे रेशनकार्ड किंवा मतदार कार्ड नव्हते. त्यावेळी तुम्ही इथले मतदार नाहीत त्यामुळे तुम्हाला धान्य मिळणार नाही असे सांगून पिटाळून लावले. असाच प्रकार तीन दिवसांपूर्वी बाणेर मध्ये घडला होता.

Lockdown : ऑनलाईन सेवेद्वारे केवळ जीवनावश्यक वस्तुंचाच पुरवठा होणार
हाताला काम नाही, पैसा नाही त्यामुळे गरीब लाेक मदतीच्या शोधात आहेत, असे असताना राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न सुरू असल्याने  या वृत्तीबद्दल चर्चा रंगली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT