पुणे

अदानी पॉवर करणार दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अणुऊर्जा व्यवसायातही प्रवेश

CD

अदानी पॉवर करणार दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक
अणुऊर्जा व्यवसायातही प्रवेश

मुंबई, ता. २४ःअदानी समूह अदानी ॲटॉमिक एनर्जी''च्या माध्यमातून अणुऊर्जा व्यवसायात प्रवेश करत असून, कंपनीने २०३५ पर्यंत १० गिगावॅट क्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच अदानी पॉवर पुढील पाच वर्षांत ४५ गिगावॅट क्षमतेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी दोन लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करणार आहे, असे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी समूहाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांना संबोधित करताना सांगितले.

गौतम अदानी म्हणाले, ‘‘जमिनीची निश्चिती आणि २०३५ पर्यंत १० गिगावॅट क्षमतेचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, आम्ही स्वच्छ आणि चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या विजेची वाढती राष्ट्रीय मागणी पूर्ण करण्यासाठी स्वतःला सुरुवातीच्या टप्प्यावरच सज्ज करत आहोत. अदानी एनर्जी सोल्युशन्सच्या पारेषण (ट्रान्समिशन) क्षेत्रातील ऑर्डरचे मूल्य वाढून ७२ हजार कोटी रुपयांवर पोहोचले आहे.’’

गेल्या वर्षी मे महिन्यात, कंपनीने भूतानमध्ये ५,००० मेगावॉट क्षमतेचे जलविद्युत प्रकल्प संयुक्तपणे विकसित करण्यासाठी भूतानच्या ‘ड्रुक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन’सोबत भागीदारी केली. अदानी टोटल गॅसने ११ लाखांहून अधिक ‘पाईप्ड नॅचरल गॅस’ घरगुती जोडण्यांचा टप्पा ओलांडला असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘‘सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीचा विचार करता, सहज उपलब्ध होणाऱ्या गॅससाठी भारतात वाढती मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने आम्ही आमच्या पीएनजी प्रकल्पांचा विस्तार अधिक वेगाने करत आहोत,’’असेही त्यांनी नमूद केले. अदानी पोर्टस अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लि.ने आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ५० कोटी टनांहून अधिक माल हाताळला. आता कंपनीचे उद्दिष्ट २०३० पर्यंत एक अब्ज टन माल हाताळण्याचे आहे, असेही अदानी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : श्रीकृष्ण जन्मभूमी वादात मोठा ट्विस्ट; ‘मुख्य दावा’ कोणाचा? सर्वोच्च न्यायालयाचे मोठे संकेत

Gokul Election Update : गोकुळच्या 'त्या' 194 दूध संस्थांचे अवसायन रद्द; मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय, या संस्थांना मिळणार मताधिकार?

‘मुळशी पॅटर्न’मुळे नाव देशभर गाजलं, पण बदनामी झाली; आता ‘पॅटर्न 2’ला मुळशीकरांचा विरोध! प्रवीण तरडेंना टेन्शन

Ghatkopar Landslide: नेटवर्क नसल्यानं डोंगरावरील घरात गेला, बर्थडेच्या आदल्या दिवशी ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT