child marriage
child marriage sakal
पुणे

Junnar News : जुन्नरला बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश

दत्ता म्हसकर

जुन्नर - जुन्नर तालुक्यातील एका सामुदायिक विवाह सोहळ्यात होणारा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला आज सोमवार ता. २६ रोजी यश आले आहे.

अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी मोनिका रंधवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी जामसिंग गिरसे यांच्या मार्गदर्शनाखाली बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पवार, तालुका संरक्षण अधिकारी भाग्यश्री घाडगे,ग्रामसेवक तथा बालविकास प्रतिबंधक अधिकारी सोमनाथ वायाळ व पोलीस यांची मदत घेऊन तातडीने विवाहस्थळी जाऊन बालविवाह थांबविला. या सामूहिक विवाह सोहळ्यास मोठया संख्येने वऱ्हाडी मंडळी उपस्थित होते.

यावेळी मुलीच्या शाळेच्या दाखल्याची पाहणी केली असता त्यावरील जन्मतारखेनुसार मुलीचे वय १५ वर्षे ६ महिने तर मुलाचे वय २४ वर्ष असल्याचे दिसून आले. मुला-मुलीचे आई-वडील व नातेवाईकांचे समुपदेशन करून कायद्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. मुलीचे १८ व मुलाचे २१ वर्षे वय पूर्ण झाल्याशिवाय त्यांचा विवाह करणार नाही असा जबाब लिहून घेण्यात आला.

हा बालविवाह रोखण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अनिल केरुरकर व कर्मचारी, बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पवार व कर्मचारी, ग्रामसेवक सोमनाथ वायाळ, तालुका संरक्षण अधिकारी भाग्यश्री घाडगे, पोलीस पाटील प्रिती कवडे यांचे सहकार्य झाले.

बाल विवाह करणे तसेच संबधित बाल विवाहात सहभागी होणे बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार गुन्हा आहे. बालविवाह झाल्यास या कायद्यात शिक्षेची तरतूद आहे. मंगल कार्यालय मालकांनी तसेच पालकांनी जन्मतारखेचा किंवा शाळा सोडल्याचा दाखला, शाळेतील जन्मनोंद या कागदपत्रांचा आधार घेऊन वयाची खात्री करावी.

आपल्या आसपास बालविवाह होत असल्यास त्वरित चाईल्ड लाईन नंबर १०९८, पोलीस हेल्पलाईन नंबर १०० किंवा पोलीस अधिकारी किंवा महिला बाल विकास विभागास माहिती देऊन प्रशासनाची मदत करावी. अशी माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवली जाईल असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय पुणेच्या वतीने करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT