adv priyadarshi telang says lok sabha 48 seats distribution shiv sena ncp aghadi politics Sakal
पुणे

अगोदर लोकसभेच्या ४८ जागा वाटून घ्या, मग वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांशी चर्चा करेल - ॲड.प्रियदर्शी तेलंग

महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) व शिवसेना (ठाकरे गट) यांनी लोकसभेच्या राज्यातील ४८ जागांचे परस्परांमध्ये वाटप करून घ्यावे, त्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी आम्ही चर्चा करू

सकाळ वृत्तसेवा

Pune News : "महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) व शिवसेना (ठाकरे गट) यांनी लोकसभेच्या राज्यातील ४८ जागांचे परस्परांमध्ये वाटप करून घ्यावे, त्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी आम्ही चर्चा करू,

सत्तेमध्ये असणाऱ्या भाजप व संघ यांना देशात व राज्यात हरविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सकारात्मक आहे.'' अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड.प्रियदर्शी तेलंग यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.

कॉंग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी लोकसभेच्या निवडणूका जाहीर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामावून घेतले जाईल, असे स्पष्ट केले होते. या पार्श्‍वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ॲड.तेलंग यांनी पक्षाची भूमिका मांडली.

यावेळी पक्षाचे राज्य प्रवक्ते फारुक अहमद, राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल गुजर, प्रवक्ते गौरव जाधव उपस्थित होते. तेलंग म्हणाले, ""महाविकास आघाडीतील घटक पक्षांची लोकसभेच्या ४८ जागांपैकी ३५ जागांची बोलणी निश्‍चित झाले असल्याचे शरद पवार यांनी प्रसिद्धिमाध्यमांना बोलताना सांगितले आहे.

जागा निश्‍चिती करताना महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीसमवेत कोणत्याही प्रकारची चर्चा केलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीने ४८ जागांचे परस्पर वाटप करून घ्यावे. त्यानंतर वंचित बहुजन आघाडी आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करेल. ओबीसी व मराठा समाजात सध्या आरक्षणावरून वाद होत आहे.

या पार्श्‍वभूमीवर, ओबीसी आपल्यासोबत टिकून राहण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून ओबीसींना किती वाटा दिला जाणार आहे, हे देखील जाहीर करावे. मागील लोकसभेप्रमाणे यावेळीही ४८ जागा लढण्यासाठी वंचितची तयारी आहे, मात्र भाजपला हरविण्यासाठी आघाडीबरोबर जाण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman Nina Kutina: गोकर्ण जंगलाच्या गुहेत सापडलेली रशियन महिला ८ वर्ष स्वयंपाक कशी करायची? मुलींना काय खायला द्यायची?

'26 निष्पापांच्या हत्यांमागे पाकिस्तानचा हात, त्या दहशतवाद्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार'; जम्मूच्या उपराज्यपालांचा कडक इशारा

Gokul Milk Politics : आप्पा महाडिकांनी थेट मुश्रीफांनाच घेतलं अंगावर, कारभार चांगला, मग ‘टोकण’ कशासाठी?

Nagpur Crime: कर्जदाराचे अपहरण, जिवे मारण्याची धमकी; सावकारासह चौघांना अटक

Latest Marathi News Updates : भाजप आमदार बसवराजविरुद्ध गुंडाच्‍या खूनप्रकरणी एफआयआर दाखल

SCROLL FOR NEXT