पुणे

पिंपळे गुरवच्या लहानग्या अद्वयची इंग्रजी कादंबरी प्रकाशित

CD

बालदिन विशेष

पिंपळे गुरव, ता. १३ ः मोबाईल स्क्रीन आणि डिजिटल गॅजेट्सच्या विळख्यात अडकलेली पिढी अशी आजकालच्या मुलांची ओळख बनत असताना पिंपळे गुरव येथील अवघ्या १२ वर्षांच्या अद्वय चौगंजकर याने आपल्या कल्पकतेच्या जोरावर एक नवी ओळख निर्माण केली आहे. या बाललेखकाने ‘द ग्रेव्हरली फाइल्स : द टायडल क्लॉक’ ही रहस्यमय आणि काल्पनिक कथेवर आधारित इंग्रजी भाषेतील कादंबरी लिहून सर्वांनाच आवक केले आहे.
अद्वयला लहानपणापासूनच रहस्यमय पुस्तकांच्या वाचनाची आवड आहे. त्याच्या मनात जेव्हा स्वतःचे पुस्तक लिहिण्याची कल्पना सुचली. तेव्हा घरच्यांनी सुरुवातीला फारसे गांभीर्याने घेतले नाही. मात्र, अद्वयचे प्रामाणिक प्रयत्न पाहून पुस्तक प्रकाशित करण्याचे आश्वासन वडील हर्षल, आई मेधा यांनी त्याला दिले. अद्वयनेही चिकाटीने अवघ्या १० महिन्यांत ‘द ग्रेव्हरली फाइल्स’ या रूपाने कथेला मूर्त रूप दिले.

काय आहे कादंबरीत ?
या कादंबरीची मध्यवर्ती कथा थिओ व्हॉस या मुलाभोवती फिरते. एखाद्या व्यक्तीच्या हाताला स्पर्श होताच त्याच्या मृत्यूशी संबंधित अनाकलनीय दृश्ये दिसण्याची एक वेगळी आणि गूढ शक्ती थिओकडे असते. थिओ अनेक रहस्यमयी घटना आणि क्लारा फिंच या मुलीच्या अचानक बेपत्ता होण्यामागचे सत्य शोधण्याचा थरारक प्रवास सुरू करतो. वाटेत सापडणारे एकेक पुरावे जोडून उलगडत जाणारे हे गूढ वाचकांना खिळवून ठेवते.


अद्वय हुशार आणि अभ्यासू आहे. पण, तो खरोखरच कादंबरी लिहून पूर्ण करेल, असा विश्वास वाटला नाही. पहिले दोन प्रयत्न अपूर्ण राहिल्यानंतर त्याने आमचा सल्ला सकारात्मकतेने घेतला आणि हार न मानतात तिसऱ्या प्रयत्नात ही कादंबरी पूर्ण केली. त्याच्या या जिद्दीचा आणि यशाचा आम्हाला आई-वडील म्हणून सार्थ अभिमान वाटतो.
- मेधा चौगंजकर, अद्वयची आई

जेव्हा कादंबरीची पहिली छापील प्रत माझ्या हातात आली. तेव्हा, स्वप्न पूर्ण झाल्याचा मनापासून आनंद होता. पण, त्याचवेळी आपल्याकडून काही चुकले तर नसेल ना, अशी अनामिक धास्तीही वाटत होती. मात्र, माझ्या पालकांनी, गुरुजनांनी आणि मित्रांनी पाठीवर फिरवलेला कौतुकाचा हात आणि दिलेली मनःपूर्वक दाद यामुळे भारावून गेलो.
- अद्वय चौगंजकर, बाललेखक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashi Tharoor: भारत समिटमध्ये 115 परदेशी वक्त्यांना प्रवेश नाकारला; शशी थरूर यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

IND vs NZ 4th ODI: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये Unplayable Deliveries असं काही नसतं, फलंदाजानं...; ८९ ऑल आऊटनंतर गौतम गंभीरकडून कानउघडणी

Thane Water Cut: ठाण्यात पुन्हा पाण्याचा ठणठणाट! सोमवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; कोणत्या भागांना फटका?

वर्षा उसगांवकर यांचे पती कोण आहेत? सोशल मीडियावर एकही एकत्र फोटो का पोस्ट करत नाहीत? अभिनेत्रीने सांगितलं कारण!

Latest Marathi News Live Update : मुंबईतील मिठी नदीजवळ नाल्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT