after porsche car accident police security and inspection of hotel and pub Sakal
पुणे

Pune Porsche Accident : नियम पालनाबाबत दिखावाच; बाणेर, बालेवाडी, भूगाव, हिंजवडी, वाकडमधील गर्दी ओसरली

कल्याणीनगर येथील अपघातानंतर शहरातील पब, रेस्टॉरंटस्‌ बार व्यावसायिकांवर पोलिस, उत्पादन शुल्क विभाग व महापालिका प्रशासनाने कारवाई केली.

पांडुरंग सरोदे -सकाळ वृत्तसेवा

Pune News : कल्याणीनगरमधील अपघाताच्या घटनेनंतर वाढलेल्या पोलिस कारवाईमुळे पुण्याच्या पूर्व भागातील पब, रेस्टॉरंटस्‌ बारच्या परिसरात काही प्रमाणात शांतता निर्माण झाली आहे. मात्र पश्‍चिम भागातील बाणेर, बालेवाडी, हिंजवडी,

वाकड, भूगाव या भागातील पब, रेस्टॉरंटस्‌ बारमध्ये अजूनही नियम पालनाचा दिखावा सुरू असल्याची सद्यःस्थिती आहे. बाहेरून बंद असले तरी, आतून व्यवसाय जोरात सुरू असल्याची सद्यःस्थिती आहे, मद्य विक्रीच्या नियमाबाबत मात्र व्यावसायिकांकडून कुठलीही ‘तडजोड’ होत नसल्याचेही चित्र आहे.

कल्याणीनगर येथील अपघातानंतर शहरातील पब, रेस्टॉरंटस्‌ बार व्यावसायिकांवर पोलिस, उत्पादन शुल्क विभाग व महापालिका प्रशासनाने कारवाई केली. पोलिसांनी पब, बार व्यावसायिकांवर कारवाईला वेग देतानाच, रस्त्यावरील ‘ड्रंक ॲंड ड्राईव्ह’ कारवाई करण्यावरही भर दिला आहे.

त्यामुळे पुण्याच्या पूर्व भागामधील पब, रेस्टॉरंटस्‌ बार व्यावसायिकांनी कारवाईचा चांगलाच धसका घेतल्याचे चित्र आहे. तर पुण्याच्या पश्‍चिम भागातील बाणेर, बालेवाडी हायस्ट्रीट, भूगाव तसेच पिंपरी-चिंचवडमधील वाकड, हिंजवडी या परिसरातही मोठ्या प्रमाणात पब, बार आहेत. हा परिसरात पहाटे तीन-चार वाजेपर्यंत तरुणाईच्या गर्दीने गजबजलेल्या स्थितीत असल्याचे चित्र होते. परंतु, अपघाताच्या घटनेनंतर पूर्व भागाप्रमाणेच पश्‍चिम भागावरही परिणाम दिसू लागला आहे.

पोलिसांचा कडक बंदोबस्त

शनिवारी रात्री पुणे स्टेशन, मंगलदास रस्ता, कोरेगाव पार्कमधील लेन नंबर सात, मुंढवा या ठिकाणी पोलिसांकडून पहाटेपर्यंत नाकाबंदी करण्यात आली होती. ब्रेथ ऍनलायझरद्वारे वाहनचालकांची तपासणी करणे, त्यांच्याकडील कागदपत्रे बघून नावे, मोबाईल क्रमांक नोंदवून घेतला जात होता. रात्रगस्तीवर असलेले अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील नाकाबंदी ठिकाणांना भेटी देऊन पाहणी करत होते.

कारवाईच्या भितीपोटी बंद

राजा बहादूर मिल परिसरात ध्वनी प्रदूषणाच्या नियमाचे उल्लंघन करत रात्री उशिरापर्यंत आवाज सुरू होता. कल्याणीनगर, मुंढवा भागातील काही पब, बार कारवाईच्या भितीपोटी साडेअकरा वाजताच बंद करण्यात आले होते.

निरिक्षण

१. बाणेर, बालेवाडी हायस्ट्रीट, भूगाव, वाकड, हिंजवडी या परिसरात आयटी क्षेत्रातील नोकरदार, विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय

२. येथील पब, बारमध्ये तरुणांची शुक्रवार ते रविवार रात्रीपर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी

३. आता पब, बारमध्ये वेळेची व मद्य घेण्यासाठीची मर्यादा आल्याने तरुणांचे प्रमाण कमी

४. काही पब, बारमध्ये अकरानंतर मद्य विक्री केली जात नसल्याचे सांगितले जाते, प्रत्यक्षात मात्र मद्यविक्री सुरूच असते.

५. पब, बार बाहेरून बंद असल्याचा दिखावा केला जातो, प्रत्यक्षात आतमध्ये सर्वकाही सुरळीत

६. पोलिस व व्यावसायिकांच्या ‘मैत्रीपूर्ण’ संबंधामुळे हे चित्र बदलण्याची व्यावासायिकांची आशा

७. प्रवेशाच्यावेळी वयाचा पुरावा, ओळखपत्र, आधारकार्डची मागणी

८. नोंदणीसाठी ॲप; मात्र वयाचा चुकीचा उल्लेख केला, तरीही ते स्वीकारले जाते

९. मद्य विक्रीसाठी ११ पर्यंतची वेळ देण्यात आली आहे, मात्र त्यानंतरही काही ठिकाणी मद्य विक्री सुरू

१०. एकीकडे नियमांचे पालन केले जात असल्याचे दाखविले जात असले, तरीही प्रत्यक्षात स्थितीमध्ये अजूनही सुधारणा होण्याची आवश्‍यकता

वाकड-हिंजवडीमध्ये काय आहे स्थिती?

  • पब व्यावसायिकांवर पोलिसांचा मोठा दबाव

  • ग्राहकांचे प्रमाण घटू लागल्याने व्यावसायात नुकसान होत असल्याची कबुली

  • आयटी क्षेत्रात साडेदहा ते साडेबारापर्यंत पब बंद होऊ लागले

  • नियमांच्या पाट्या, सीसीटीव्ही लावण्यास प्राधान्य

  • व्यावसायात वेळेत बंद, पोलिसांकडून नियमितपणे पाहणी

  • रात्री ११ नंतर मद्यविक्री बंदचा फारसा उपयोग होत नाही

  • भूगाव भागातील पब आता नियमांचे पालन करू लागले

  • पोलिसांची नाकाबंदी, रात्रगस्त वाढली

  • तरुणांच्या घोळक्‍यांना सार्वजनिक ठिकाणी थांबण्यास पोलिसांकडून मज्जाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT