Agitation from traders protesting GST 5 percent on food grains pune  sakal
पुणे

खाद्यान्नावर जीएसटी आकारणीच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांकडून निवेदन

राज्यभरातील व्यापाऱ्यांचा आंदोलनात्मक पवित्रा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अन्नधान्य, खाद्यान्नावर (नाॅन ब्रँडेड) पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्यात येणार आहे. त्याच्या निषेधार्थ राज्यभरातील व्यापाऱ्यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. त्यानुसार राज्यातील वेगवेगळ्या भागातील जीएसटी कार्यालयातील अधिकाऱ्यांना व्यापारी संघटनांकडून मंगळवारी निवेदन देण्यात करण्यात आले. मार्केट यार्डातील भुसार व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या दी पूना मर्चंट्स चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय जीएसटी कार्यालयातील मुख्य आयुक्त श्रीनिवास टाटा, राजीव कपूर तसेच राज्य जीएसटी कार्यालयातील अतिरिक्त आयुक्त धनंजय आखाडे यांना निवेदन दिले.

शिष्टमंडळात दी पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, सचिव रायकुमार नहार, सहसचिव इश्वर नहार, माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले, दिनेश मेहता, जवारलाल बोथरा, नवीन गोयल, संदीप शहा, आशिष दुगड आदींचा समावेश होता.

अन्नधान्य तसेच खाद्यान्नांवर पाच टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यास व्यापाऱ्यांचा विरोध आहे. पाच टक्के जीएसटी आकारल्यास त्याची झळ सामान्यांना बसेल तसेच व्यापाऱ्यावर परिणाम होईल. व्यापारी आणि सामान्य ग्राहकांना झळ सोसावी लागेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.तसेच छोट्या तसेच मोठ्या व्यापाऱ्यांना जीएसटी कायद्यातील नियमांची पूर्तता करणे त्रासदायक ठरणार आहे. त्यासाठी अधिकचा खर्चही सोसावा लागणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर केंद्र शासनाने 5 टक्के लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भाववाढ होणार आहे. त्यामुळे पारंपारिक व्यवसाय बंद करावे लागतील. त्यावर अवलंबून असलेले कोट्यावधी लोक बेरोजगार होतील. ई- कॉमर्स व मॉल यांनाच व्यवसाय करणे शक्य होईल.

- वालचंद संचेती, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्स

करोना काळात नोकऱ्यांच्या संधी कमी झाल्या आहेत. अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. अशा वेळेस एकूण ग्राहकांची खर्च करण्याची क्षमता कमी झाली आहे. ग्राहक जीएसटीचा भार सहन करणार नसल्यामुळे शेतकऱ्यास त्यांच्या उत्पादनाच्या किंमतीमधून जीएसटी कमी केल्यामुळे शेतकऱ्यास कमी पैसे मिळतील. तसेच ग्राहकांकडून जीएसटी वसूल केल्यामुळे ग्राहकांवर त्याचा बोजा पडेल. सर्वच वस्तूंच्या किंमतीत वाढ होईल.

- मुकेश सतीश गोयल, व्यापारी, मार्केट यार्ड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT