पुणे

‘ॲग्रिकॉस’चे आंदोलन दहा दिवसांनंतर मागे कृषिमंत्री भरणे यांच्या लेखी पत्रानंतर निर्णय

CD

पुणे, ता. १४ : कृषी आकृतिबंध रद्द करण्यासह अन्य मागण्यांसाठी कृषी आयुक्तालयाबाहेर गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन अखेर सोमवारी संपुष्टात आले. ‘ॲग्रिकॉस’ या कृषी विद्यापीठ पदवीधर संघाचे अध्यक्ष ॲड. अनंत चोंदे पाटील यांंची सोमवारी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी भेट घेऊन लेखी पत्र दिल्यानंतर चोंदे पाटील यांनी उपोषण सोडले.
कृषिसेवा महासंघाव्यतिरिक्त ॲग्रिकॉसचे ॲड. चोंदे पाटील यांनीही आंदोलनाची हाक देत उपोषणास बसले होते. राज्यभरातील तीन लाख कृषी पदवीधरांनी माझ्यावर विश्वास दाखविला आहे. मी त्याला तडा जाऊ न देता कृषिमंत्री भरणे यांच्या उपस्थितीतच उपोषण सोडण्याचा निर्धार त्यांनी केला होता. त्यानुसार आज दुपारी एक वाजता भरणे यांनी उपोषणस्थळी येऊन मागण्यांबाबत लेखी पत्रही दिले. त्यानंतर चोंदे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी कृषी संचालक विनयकुमार आवटे, कृषिसेवा महासंघाचे प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब चापले, प्रवीण कदम व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषी विभागाचा आकृतिबंधाच्या अनुषंगाने सध्याचा प्रस्तावित आकृतिबंध हा कृषिमंत्र्यांच्या आदेशान्वये स्थगित करण्यात आला असून, आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तो रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. तसेच २७ डिसेंबर डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जन्मदिवस ‘ॲग्रीकॉस’ दिवस म्हणून साजरा करण्याची मागणी मान्य करण्यात आली. तर राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील भरतीबाबत पुढील सहा महिन्यांमध्ये भरती प्रक्रिया चालू करण्यासंदर्भात कृषी मंत्र्यांच्या दालनात बैठक घेऊन योग्य कार्यवाही करण्यात येईल. तसेच अन्य मागण्यांवर पुढील दोन महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही बैठक घेऊन कार्यवाही करण्यात येईल, असे उपोषणकर्त्यांना देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे.
------------------
आकृतिबंध रद्द करण्यासह अन्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल मी परिवारातर्फे कृषिमंत्री भरणे यांचे आभार मानतो. त्यांच्या नेतृत्वाखाली कृषी विभाग आणि शेतकऱ्यांसाठी यापुढे चांगले दिवस येतील, अशी आशा व्यक्त करतो.
- ॲड. अनंत चोंदे पाटील, अध्यक्ष, ॲग्रिकॉस कृषि विद्यापीठ पदवीधर संघ.
-----------------------------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT