पुणे

कृषी विद्यापीठाच्या परीक्षांचा आराखडा जाहीर;जूनमध्ये होणार शेवटच्या सत्राच्या परीक्षा

सकाळवृत्तसेवा

पुणे - कृषी विद्यापीठाने परीक्षेचा कृती आराखडा जाहीर केला आहे. यामध्ये पदविका, कृषी तंत्र निकेतन आणि पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षातील शेवटच्या सत्रातील विद्यार्थ्यांची जूनमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे. तर, इतर विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनावर पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार शिक्षण समन्वय समितीने राज्यातील कृषी विद्यापीठ व संलग्न संस्थांच्या परीक्षेचा आराखडा तयार केला आहे. 

पदविका अभ्यासक्रम (दोन वर्ष) : प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन करून, द्वितीय वर्षात प्रवेश दिला जाईल. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा जूनच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात घेण्यात येईल. 

तंत्रनिकेतन (तीन वर्ष) : प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनावर पुढील वर्षांत प्रवेश. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची 8 ते 15 जून दरम्यान लेखी परीक्षा घेतली जाईल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पदवी (चार वर्ष) : पदवीच्या प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना 50 टक्के मूल्यांकन चालू तर 50 टक्के गुण मागील सत्राच्या मूल्यांकनातून देण्यात येतील व पुढील वर्षात प्रवेश. तर शेवटच्या आठव्या सत्राची परीक्षा भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 15 जूनपूर्वी ऑनलाईन व ऑफलाईन घेतली जाईल व निकाल 15 जुलैपूर्वी जाहीर होईल. 

पदव्युत्तर : लॉकडाऊन संपल्यावर अंतिम सत्राच्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा घेतल्या जातील. शोधनिबंध सादर करण्यासाठी 31 मे ऐवजी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

- पदवीच्या तिसऱ्या, पाचव्या सत्राची नोंदणी 1 ऑगस्ट तर सातव्या सत्राची नोंदणी 1 जुलै रोजी होणार 
- पदवीचे नवीन वर्ष 2 सप्टेंबरपासून सुरू होणार 
- लॉकडाउन वाढल्यास वेळपत्रकात बदल होऊ शकतो 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Rain Forecast : विदर्भात पावसाचा जोर वाढणार ; चक्रीवादळाचा प्रभाव, २४ सप्टेंबरनंतर मुसळधारेची शक्यता

FDA Action: 'सुलेमान मिठाईवाला'वर बडगा! मुंबईतील १० आस्थापनांचे परवाने एफडीएकडून निलंबित

Asian Games 2026 : भारतीय नौकानयनपटू 'संपावर' जाण्याच्या तयारीत! जपानमध्ये खेळाडूंकडून बंडाची भूमिका; नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : गंगाखेड तालुक्यात गांजाची लागवड, ७६.९६ लाखांचा माल जप्त

Koyna Dam Water Release : कोयना धरणातून 3983 क्युसेक विसर्ग; कृष्णा नदीची पातळी वाढणार, आज सायंकाळपर्यंत पाणी पोहोचणार सांगलीत

SCROLL FOR NEXT