jowar bajra sakal
पुणे

Grains : दीडपट भाववाढीमुळे उत्पादक होणार मालामाल

खरिपातील प्रतिकूल परिस्थितीचा परिणाम आता धान्य बाजारामध्ये दिसू लागला आहे.

सकाळ वृत्तसेवा

काटेवाडी - खरिपातील प्रतिकूल परिस्थितीचा परिणाम आता धान्य बाजारामध्ये दिसू लागला आहे. जिल्ह्यातील बाजार समितींच्या बाजारांमध्ये धान्याची आवक ५० ते ६० टक्क्याहून कमी झाली आहे. यामुळे बाजारभाव मागील वर्षाच्या तुलनेत दीडपट वाढले आहेत. भुसार बाजारामध्ये शांतता असली तरी दसरा, दिवाळी हे सण व त्यानंतरच्या काळात जिल्ह्यातील उत्पादक मालामाल होण्याची शक्यता अधिक आहे.

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या गावरान ज्वारीची आवक होत आहे. गावरान ज्वारीला उच्चांकी ५ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहे. तर बाजरीला ३ हजार २५२ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. बारामती बाजार समितीमध्ये हा सर्व भुसार माल फलटण, सातारा, इंदापूर, दौंड, सोलापूर जिल्हा आदी भागातून येत आहे.

बाजारामध्ये सध्या मालाची आवक कमी असली तरी खरेदीदारांची देखील संख्या कमी आहे. सध्या ग्राहक सणासुदीच्या दिवसांमुळे धान्य खरेदी करत नाही. परिणामी भुसार बाजारामध्ये ग्राहकांची संख्या कमी आहे. मात्र, दिवाळी संपल्यानंतर धान्य खरेदी कडे ग्राहकांचा कल राहतो. त्यावेळी मात्र दरामध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ज्वारीचे दर राहणार तेजीत
पुणे जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात ज्वारीचे पीक घेतले जाते. पाण्याची उपलब्धता लक्षात घेत रब्बी हंगामामध्ये देखील ज्वारीच्या पेरण्या सरासरीपर्यंत जातील का? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढील काळात ज्वारीचे दर तेजीत राहणार आहेत. सध्या जुनी ज्वारी बाजारामध्ये येत आहे. गावरान ज्वारीची चांगली आवक बारामती बाजार समितीमध्ये होत आहे.

मका खरेदी केंद्र सुरू...
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासकीय मका खरेदी केंद्र सुरू झाले आहे. सध्या येथे शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. यावेळी राज्य शासनाने दोन हजार ९० रुपये प्रतिक्विंटल असा मकेला हमीभाव दिला. मात्र, सोयाबीनचा हमीभावापेक्षा अधिक आहे. सोयाबीनला ३ हजार ९५० असा हमीभाव असताना सध्या बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ४ हजार ४२९ अशा उच्चांकी दराने सोयाबीन विकला जात आहे.


बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बारामती परिसरातून अवघा पाच टक्के शेतमाल लिलावासाठी येत आहे. खुल्या लिलाव पद्धतीमुळे बाहेरील भागातून धान्याची चांगली आवक इथे होत आहे. इतर बाजार समितीच्या तुलनेत येथे शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळत आहे.
- अरविंद जगताप, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती

सध्या शेतकऱ्यांचा माल बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर येत आहे. खरेदीदारांची संख्या कमी आहे. त्यामुळे मागील काही दिवसांच्या तुलनेत सध्या दर कमी झाले आहेत. मात्र दिवाळीनंतर धान्य बाजार ते चित्र राहणार आहे.
- मिलिंद सालपे, व्यापारी, कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती

धान्याच्या आवक व दर क्विंटलमध्ये (१६ ऑक्टोबरपर्यंत)
धान्य प्रकार ---------- आवक ------------ दर

गावरान ज्वारी--------- १३१------------४,५००
मका (तांबडी ) ---------- ७०९---------- २,०५०
बाजरी हायब्रीड --------- १२१----------- २,२५०
बाजरी महिको ----------- ८१ ------------ २,४००
गहू २१८९ -------------- १९९ ------------ २,५५१
गहू लोकवन ------------- २९९ ------------ २,२००
ज्वारी हायब्रीड ---------- १९६ ------------- ३,०००
सोयाबीन (पिवळा ) ------ ४२७ ------------ ४,३९०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mill Workers House: मुंबईसह ठाणे, मिरा-भाईंदरमध्येही घरे, गिरणी कामगारांसाठी म्हाडाचं मोठं पाऊल; जागेचा शोध सुरू

Gokul Election Politics : देवाभाऊंना बोला... मुश्रीफांना घ्या... गोकुळ बिनविरोध करा; राजेश पाटील यांचा शिवाजी पाटील यांना सल्ला, महाराजस्व कार्यक्रमात जुगलबंदी

Latest Live Updates Marathi : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, विद्यार्थी आंदोलनातील हिंसाचाराची SIT चौकशी

'एक अधिकारी, एक कार', सरकारी ताफ्यावर मोदी सरकारचा मोठा निर्णय; गैरवापर आणि खर्च कमी होणार

Ambernath: १२व्या मजल्यावरून मांजरीला फेकलं, इसमाचं अमानुष कृत्य CCTVत कैद; अंबरनाथमधील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT