Ajit-Pawar
Ajit-Pawar 
पुणे

‘कृषी’मधील व्यवस्थापन कोटा रद्दचा निर्णय चुकीचा - अजित पवार

सकाळवृत्तसेवा

बारामती शहर - कृषी महाविद्यालयांमध्ये असलेला व्यवस्थापन कोटाच रद्द करण्याचा अजब निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय चुकीचा असून, याबाबत सरकारकडे दाद मागणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

अनेकान्त इंग्लिश मीडियम स्कूलच्या उद्‌घाटन कार्यक्रमात अजित पवार यांनी या निर्णयाचा चांगलाच समाचार घेतला. सरकार मन मानेल त्या पद्धतीने निर्णय घेत आहे. राज्यात अनेक महाविद्यालये युवकांना कृषीचे ज्ञान देत आहेत. संस्थाचालक त्यांच्या परिसरातील होतकरू युवक युवतींना त्यांच्याच भागात शिक्षण मिळावे, या उद्देशाने व्यवस्थापन कोट्यातून गरजू मुलांना प्रवेश देतात. मात्र, सरकारने हा व्यवस्थापन कोटाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

या संदर्भात या विभागाचा कार्यभार असलेल्या चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांना हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगितले आहे. त्यांनीही याविषयी लक्ष घालतो, अशी ग्वाही दिली आहे. मात्र, असे निर्णय योग्य नसल्याची टीका पवार यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Summer Health Care : उन्हाळ्यात अशक्तपणाचा वाढतोय धोका.! कसा करावा उष्माघातापासून बचाव ?

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT