पुणे

नगर ः अहिल्यानगर जिल्ह्यात मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षणचे काम पूर्णत्वाकडे

CD

अहिल्यानगरमध्ये मतदार यादीचे पुनरीक्षण पूर्णत्वाकडे
--
दोन लाखांहून अधिक मतदार स्थलांतरित अथवा शोध लागेना
--

ॲग्रोवन वृत्तसेवा

अहिल्यानगर : जिल्ह्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांपैकी कर्जत-जामखेड, अहिल्यानगर शहर, श्रीरामपूर, शिर्डी आणि कोपरगाव या पाच मतदारसंघांत शंभर टक्के, तर उर्वरित मतदारसंघांत ९८ टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचे काम सुरू आहे. जिल्ह्यात एकूण ३८ लाख १० हजार १०२ मतदार असून, त्यापैकी चार लाख २६ हजार ११३ मतदार ‘असंकलित’ श्रेणीत आहेत. एकूण मतदारांच्या तुलनेत त्यांचे प्रमाण ११.१८ टक्के आहे. अहिल्यानगर शहरात हे प्रमाण सुमारे २२ टक्के असल्याचे गाढे यांनी सांगितले.

मतदार यादीतील मतदारांच्या नावासमोर घर क्रमांकाचा तपशील अचूक नोंदविण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी मतदारांच्या घर क्रमांकाची अचूक माहिती संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण किंवा नवीन मतदान केंद्र प्रस्तावित करताना संबंधित शाळेचा ‘यू-डायस’ कोड नमूद करण्याचे निर्देशही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाची कार्यवाही सुरू आहे.

असंकलित मतदारांमध्ये मृत, दुबार, कायमस्वरूपी स्थलांतरित आणि शोध न लागलेल्या मतदारांचा समावेश आहे. प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे (बीएलओ) अशा मतदारांच्या याद्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या याद्यांची माहिती राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय सहाय्यकांना देऊन त्यासंदर्भात बैठका घेण्याच्याही सूचना देण्यात आल्याचे गाढे यांनी सांगितले.

चौकट : दोन लाखांहून अधिक मतदार स्थलांतरित अथवा शोध लागेना

जिल्ह्यातील चार लाख २६ हजार ११३ असंकलित मतदारांपैकी एक लाख ४० हजार ७६६ मतदार मृत, तर ६० हजार ८४१ मतदार दुबार असल्याचे आढळून आले आहे. उर्वरित सुमारे दोन लाख २४ हजार ५०६ मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित आहेत किंवा त्यांचा शोध लागू शकलेला नाही.

पुनरीक्षणाचे काम शंभर टक्के पूर्ण झाल्यानंतर मृत, दुबार आणि कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांच्या याद्या स्थानिक, तालुका आणि जिल्हास्तरावर तसेच जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या संदर्भात दावे व हरकती दाखल करण्यासाठी २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६ अशी सुधारित मुदत देण्यात आली आहे. प्राप्त दावे व हरकतींवर २२ ऑक्टोबरपर्यंत निर्णय घेण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddhivinayak Temple : ठाकरे गटाची अडचण वाढणार? सिद्धिविनायक मंदिरातील देणगी व्यवहारांची मागील पाच वर्षांची होणार चौकशी; सीएम फडणवीसांचे आदेश

IPL 2027 Trade Update: हार्दिक पांड्याच नव्हे, तर Mumbai Indians 'या' पाच खेळाडूंना करू शकते संघाबाहेर; MI चा मास्टर प्लान

Missing Link: मिसिंग लिंक अपघाताआधी काय घडलं? किरकोळ अपघातामुळे २ मार्गिका बंद, वाहनांनी अचानक लेन बदलताच फॉर्च्युनरची ट्रकला धडक

Latest Marathi News Live Update : भाजपचे खासदार धनंजय महाडिक सहपरिवार आमदार सतेज पाटील यांच्या भेटीला

स्टार प्रवाहची आणखी एक मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; कलाकारांनी शेअर केल्या पोस्ट; बांदेकरांच्या सुनेशी आहे संबंध

SCROLL FOR NEXT