पुणे

रोडरोमियोंच्या बंदोबस्तासाठी अजित पवार यांनी दिला 'हा' इशारा

सकाळ वृत्तसेवा

माळेगाव : ``जिल्ह्यात पोलिस अधीक्षकांनी शाळकरी मुली, युवती व महिलांच्या सुरक्षिततेचा विषय गांभिर्याने घेतला आहे.  विशेषतः शाळा-काॅलेज परिसरात रोडरोमियो अथवा गुंड प्रवृतीचे टारगट मुले दिसताक्षणी ठोकून काढण्याचे आदेश पोलिसांना मिळालेले आहेत. माझा मुलगा असला तरी पोलिस सोडणार नाहीत. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे, अन्यथा मीही तुम्हाला मदत करू शकणार नाही,``अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांच्या धडक मोहिमेला पाटींबा दिला.

बारामती, इंदापूरसह विविध तालुक्यात शाळा-काॅलेज परिसरात रोडरोमियोंची संख्या, गुंड प्रवृती अधिकच बळावत चालल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न खूपच गंभीर झाला आहे. त्यासंबंधीची तक्रार खुद्द अजित पवार यांनी याआगोदरच पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांच्याकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर पवार आज एका जाहिर कार्यक्रमात बोलत होते.

ते म्हणाले,`` बारामतीमध्ये अद्ययावत शाळा, महाविद्यालयांची संख्या आणि येथील चांगले वातावरण पाहून बहुतांशी पालक शारदानगर, विद्या प्रतिष्ठाण, टी.सी.काॅलेज, माळेगाव इंजिनिअरिंग काॅलेज आदी संस्थांना प्राधान्य देतात. त्यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातून मुल-मुली शिक्षणासाठी बारामतीला पसंती देतात. परंतु अलिकडच्याकाळात टारगट मुलांनी येथील शाळा, काॅलेज परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर काही मुले कशाचेही अमिष दाखवून मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. त्यांचे शोषण करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या गंभीर समस्येवर लागलीच कारवाई होण्यासाठी मी स्वतःहा लक्ष घातले आहे,``

त्याप्रसंगी उपस्थितांनी टाळ्यावाजवून पवार यांच्या भूमिकेचे स्वागत केले. दुसरीकडे, शारदानगर शैक्षणिक संकुलालगत लोखंडी पुलावर थांबणाऱ्या टार्गट मुलांची नावे सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलिसांनी काढलेली आहे. यापुढील काळात या संबंधित टोळक्यांच्या मुस्क्या आवळण्यासाठी पोलिसांनी छुपा बंदोबस्त लावल्याची माहिती पुढे आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT