sadhvi pragya singh thakur says limited amount of alcohol is medicine video goes viral  
पुणे

Ajit Pawar: साध्वी प्रज्ञासिंह यांचा दाखला देत राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा अजितदादा, फडणवीसांना टोला

नवाब मलिक यांना महायुतीत घेण्याला फडणवीसांनी विरोध दर्शवला आहे. त्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : नवाब मलिक यांना महायुतीत घेण्याला फडणवीसांनी विरोध दर्शवला आहे. त्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यात आता राष्ट्रवादीच्या एका महिला नेत्यानं उडी घेत साध्वी प्रज्ञासिंह यांचा दाखला देत थेट अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना निशाणा बनवलं आहे. (Ajit Pawar and Devendra Fadnavis targated by NCP leader Rupali Patil due to Nawab Malik row)

हे अशोभनीय

नवाब मलिक यांना टार्गेट करणाऱ्या फडणवीसांविरोधात राष्ट्रवादीच्या पुण्यातील नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपली भूमिका मांडली. ट्विट करुन त्यांनी म्हटलं की, भाजपनं साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर आतंकवादाचे आरोप होऊनही त्यांना खासदारकीची उमेदवार दिली. राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्यावर तर देशद्रोह आरोप झाले. पण गुन्हा सिद्ध झालेला नाही ते केवळ आरोप आहेत. (Latest Marathi News)

आपलं राज्य कायद्यानुसार चालतं आणि चालणार. आपला तो बाब्या लोकांचं ते कार्ट असं करणं अशोभनीय आहे, अशा शब्दांत ठोंबरे यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं आहे.

साध्वी प्रज्ञासिंह मालेगाव बॉम्बस्फोटाच्या आरोपी

भाजपच्या भोपाळ मतदारसंघातील खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर सन २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा कट रचल्याप्रकरणात आरोपी आहेत. त्यांच्यावर देशविघातक कृत्यांच्या कलमांखाली गुन्हे दाखल झाले होते, यासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला. (Marathi Tajya Batmya)

काही वर्षांपूर्वी त्यांच्यावरील मोक्का देखील हटवण्यात आला. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला आणि त्यांना भोपाळमधून भाजपनं लोकसभेसाठी उमेदवारीही दिली. यात त्या निवडून आल्या आणि खासदार बनल्या.

नवाब मलिक प्रकरण काय?

नवाब मलिक यांनी विधानसभेच्या अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभेत हजेरी लावली. यावेळी ते सत्ताधारी पक्षाच्या बाकांवर जाऊन बसले याचाच अर्थ असा की त्यांनी शरद पवारांची नव्हे तर अजित पवारांच्या बाजूनं जाणं स्विकारलं.

पण यावरुन सभागृहात विरोधीपक्षानं भाजपला टार्गेट केल्यानंतर फडणवीसांनी अजितदादांना पत्र लिहित आणि ते ट्विटरवरुन सार्वजनिक करत मलिकांना महायुतीत घेण्यास विरोध दर्शवला आणि सत्तेपेक्षा आमच्यासाठी देशहित महत्वाचं असं म्हटलं. पण त्यांच्या या विधानामुळं त्यांना ट्रोल व्हावं लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : काँग्रेसच्या पत्रानंतरही मकर संक्रातीला लाडक्या बहीणींना पैसं मिळणार? CM फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देत विषयच मिटवला...!

BMC Election Voting: १५ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, मतदानाच्या दिवशी रजा नाकारणाऱ्या आस्थापनांवर कारवाई

Latest Marathi News Live Update : माजी आमदार शिरीष चौधरींच्या घरावरील हल्ला हा राजकीय कट; अवैध धंदेवाल्यांवर आरोप

Baba Vanga Predictions 2026: जग मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर? माणसांची निर्णयक्षमता हरवणार, पृथ्वीवर परग्रहवासी येण्याचा दावा

Aluminum Foil किंवा Container मध्ये अन्न ठेवता? जीवावर बेतेल; तज्ज्ञांचा धक्कादायक इशारा

SCROLL FOR NEXT