Ajit Pawar 
पुणे

Ajit Pawar : आरएसएसचे वरिष्ठ प्रचारक मदनदास देवी यांच्या अंत्यदर्शनासाठी अजित पवार पुण्याला रवाना

रवींद्र देशमुख

मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक मदनदास देवी वय 81 यांचे 24 जुलै रोजी पहाटे 5 वाजता बंगलोर येथे निधन झाले आहे. मदनदास यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यविधी होणारआहे. त्यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याला रवाना झाले आहेत.

मदनदास देवी यांच्या अंत्यविधीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. तर अजित पवारही मुंबईहून पुण्याला रवाना झाले आहेत.

मदनदास देवी यांनी वयाच्या 25 व्या वर्षी घर सोडत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करण्यास सुरुवात केली होती. संपूर्ण आयुष्य त्यांनी संघासाठी अर्पण केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देशात प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी संपूर्ण देश पिंजून काढला होता. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील मदनदास देवी यांचा सल्ला मानत होते.

शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला होता. त्यानंतर आयएलएस विधी महाविद्यालयातून त्यांनी गोल्ड मिडल मिळवत एलएलबी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Revenue Court: महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून, नवी 'एसओपी' लागू; प्रकरणांचा झटपट निपटारा होणार!

Nashik Drowning: ३ मुलं डोळ्यासमोर गटांगळ्या खायला लागली, आईने वाचवायला उडी मारली; बुडून चौघांचाही मृत्यू..

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

SCROLL FOR NEXT