Ajit Pawar letter to Shinde-Fadnavis govt Demand to rename Velhe as  Rajgad pune
Ajit Pawar letter to Shinde-Fadnavis govt Demand to rename Velhe as Rajgad pune esakal
पुणे

Ajit Pawar : अजित पवारांचे शिंदे-फडणवीसांना पत्र ; वेल्ह्याचे नामकरण राजगड करण्याची मागणी

मनोज कुंभार-वेल्हे

वेल्हे : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नामकरण राजगड तालुका असं करावं, त्यासंदर्भातील प्रस्तावास मान्यता देण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. त्याबाबतचे पत्र पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठविले आहे. त्याद्वारे पवार यांनी ही मागणी केली आहे.

सरकारला लिहिलेल्या पत्रात अजित पवार यांनी म्हटले आहे की, स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी २७ वर्षे राज्य कारभार चालवला आहे. त्यामुळे या किल्ल्याशी राज्यातील जनतेच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणूनच वेल्हे तालुक्याचं नामकरण हे राजगड असे करण्यात यावं, अशी जनतेची तीव्र इच्छा आहे.

याबाबत तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींपैकी ५८ ग्रामपंचायतींनी नामकरणासाठी सकारात्मक ठराव दिला आहे. पुणे जिल्हा परिषदेनेही तसा ठराव केलेला आहे. वेल्हे तालुका हा शिवकालीन आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला तसेच स्वराज्यात महत्वाचे ठरलेले राजगड आणि तोरणा हे दोन किल्ले असलेला तालुका आहे. या तालुक्याचे जुने दस्तऐवज पाहता किल्ले तोरणाचे नाव प्रचंडगड या नावाने तालुक्याची ओळख होती.

तथापि या तालुक्याचे मुख्य ठिकाण हे वेल्हे बुद्रूक, घेरा येथे असून तालुक्याचे नाव वेल्हे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. वेल्हे तालुक्यातील जनतेच्या भावना ह्या राजगड किल्ल्याशी जोडलेल्या आहेत. स्वराज्याची पहिली राजधानी वेल्हे तालुक्यात असून किल्ले राजगडावरून या तालुक्याचे नामकरण हे राजगड करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: कर्नाटकात 28 जागांपैकी आम्ही 25 जागा जिंकणार- बीएस येडियुरप्पा

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

SCROLL FOR NEXT