Ajit Pawar On Maharashtra Flood 
पुणे

Ajit Pawar On Flood : आता पाऊस आटोक्यात आला आहे, पण.. अजित पवार यांनी घेतला पूरस्थितीचा आढावा, नागरिकांना म्हणाले..

Maharashtra Rain Update : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन देखील केले आहे.

रोहित कणसे

राज्यातील अनेक जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून तुफान पाऊस होत आहे. राज्यातील अनेक नद्यांची पाणीपातळी वाढली असून पुणे, मुंबई या शहरांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन देखील केले.

अजित पवार म्हणाले की, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा येथे येलो अलर्ट सांगितला आहे. येथे दळवळणच्या दृष्टीने गडचिरोलीचा संपर्क आता फक्त चंद्रपूर येथून होतो आहे, पण प्रशासन लक्ष ठेवून आहे. आवश्यक खबरदारी प्रशासनाने घेतली आहे.

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर काही प्रमाणात रत्नागिरी आणि विशेषतः पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली... सांगली येथे पाऊस कमी आहे. पण धरणातले पाणी विशेषतः वारणा, कोयना, कृष्णा नदीचे पाणी पुढे जाते... आता अडीच लाख क्युसेक पाणी अलमट्टी धरणातून सोडण्यात आले आहे. आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही तीन लाखापर्यंत सोडा कारण पंचगंगा धोक्याच्या पातळीवरून जात आहे. राधानगरी फुल्ल भरलं आहे, दूधगंगामध्ये पाणी अजून साठवू शकतो. वारणाची क्षमता ७५ टक्के ठेवली आहे. पाणी येतंय तेवढं आपण सोडतोय. कोयना धरणात पण ७५ टक्के पाणी ठेवलं आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

पुण्यातून वाहणारे खडकवासलाचे ओव्हरफ्लोचे सगळे पाणी ३५ हजारांपर्यंत गेले होते, आता ते १५ हजारांपर्यंत आणले आहे. सगळी माहिती घेता, अधिकाऱ्यांना आताच पाणी वाढवायचे असेल तर वाढवा असं सांगण्यात आलं आहे. कारण सातच्या पुढे अंधार पडल्यानंतर पाणी वाढवलं तर सखल भागात राहणाऱ्या नागरीकांना त्रास सहन करावा लागू शकतो, त्याएवजी येतंय तेवढं पाणी सोडण्यास सांगितलं आहे, असेही अजित पवार म्हणाले.

सध्या जेवढा धरणात इनफ्लो आहे तेवढा आऊट फ्लो ठेवला आहे. पण तो वाढवण्यास सांगितले आहे. कारण रात्री जास्त पाऊस झाला तर तेवढा पाणीसाठा वाढवण्याची क्षमता धरणात असली पाहीजे, असेही अजित पवार म्हणाले.

वरसगाव, पानशेत, टेमघर ही धरणे ७० टक्के भरली असल्याने येथे पाणीसाठवण्याची क्षमता आहे , पवना देखील ७० टक्केच भरले आहे इथेही पाणी साठवले जाऊ शकते असेही पवार म्हणाले. सगळ्या धरणाच्या कॅनॉलमधून पाणी सोडण्यास सांगितले आहे. सगळ्या उपसा सिंचन योजना सुरू करण्यास सांगितले आहे, शक्य त्या तलावात पाणी साठवण्यास सांगितेल आहे, असेही पवार म्हणाले.

आता पाऊस आटोक्यात आला आहे, पण, नागरिकांना विनंती आहे की त्यांनी अजिबात घाबरून जायची गरज नाही. कारण आम्ही आर्मीला देखील अलर्ट राहायला सांगितलं आहे. एकता नगर येथे आर्मी आम्ही अपॉइंट केली आहे. इथं आर्मीचे १०० लोकं आहेत. त्यामध्ये अभियंते, डॉक्टर चार बोटी आहेत. एनडीआरएफचे ४० लोक आणि चार बोटी देखील आहेत, असेही अजित पवार यांनी सांगितले.

पुण्यातील एकता नगरमध्ये गुडघाभर देखील पाणी राहिलेलं नाहीये आणि बोटीच्या माध्यमातून सर्व लोकांना सुरक्षित ठिकाणी शिफ्ट करण्यात आले आहे. ज्यांना राहायची जागा नाही अशांसाठी महानगर पालिकेकडून सोय केली आहे, असेही अजित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT