Ajit-3.jpg
Ajit-3.jpg 
पुणे

निवडणूकीत नवीन चेहऱ्यांना संधी देणार : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी(पुणे) : काळानुरूप बदल होतच असतात. यामुळे आगामी निवडणूकीत नवीन चेहऱ्याला संधी दिली जाईल. तसेच पक्ष संघटनेतही फेरबदल करण्याचे संकेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यासाठी ते पिंपरी चिंचवड शहरात आले होते. त्यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, भाऊसाहेब भोईर, अतुल शितोळे, महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी बोलताना पवार म्हणाले, "भाजपने स्मार्ट सिटीची वेस्ट सिटी केली आहे. स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाला आहे. भाजपचेच नगरसेवक महापालिकेत कचरा आणून टाकत आहेत. प्रशासनावर त्यांचा वचक राहिलेला नाही. कचरा वाहतूक करणारी वाहने घेताना महिलांच्या उंचीचा विचार केलेला नाही. शास्तीकर आणि रेडझोनचा प्रश्‍न सोडवू, असे आश्‍वासन पाच वर्षापूर्वी शहरातील नागरिकांना दिले होते. मात्र आजही नागरिकांना शास्तीकराच्या नोटीस येत आहेत. जे प्रश्‍न सोडविणे राज्य आणि केंद्र सरकारच्या हातात आहे त्या प्रश्‍नांबाबत आमदार आयुक्‍तांशी चर्चा करीत आहेत.

पवार म्हणाले, "शहरात पोलिस आयुक्‍तालय सुरू केल्याचे श्रेय भाजप घेत आहे. भाजप नगरसेविकेच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. स्थायी समितीच्या अध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते. विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयावर हल्ला झाला. शहरातील गुन्हेगारीत वाढ झाली आहे. या वाढत्या गुन्हेगारीचे श्रेय आता कोण घेणार? असा सवालही त्यांनी केला. 

माथाडी कामगारांच्या नावाखाली उद्योजकांना धमकावले जात आहे. भंगाराच्या माफियांनी उद्योजकांना जेरीस आणले आहे. अनेक कंपन्या येथून निघून जात आहेत. शहरातील वाहतूकीचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. शहरात मादक पदार्थांची विक्री वाढली असून शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी त्यास बळी पडत आहेत. मात्र पोलिसांचे त्याकडे लक्ष नाही. प्राधिकरणातील शेतकऱ्यांना साडेबारा टक्‍के परतावा देणार असल्याचे मुख्यमंत्री जाहीर करतात. तर दुसरीकडे एवढ्या उशीरा परतावा कशाला द्यायचा, असा प्रश्‍न पालकमंत्री विचारत आहेत. 

पारदर्शकतेचे आश्‍वासन ठरले फोल
पारदर्शक कारभाराची हमी देत भाजप महापालिकेत सत्तेवर आले. ठेकेदारांमधील रिंग आणि निविदा प्रक्रियेशिवाय मर्जीतील ठेकेदारांना काम दिल्यामुळे पारदर्शकतेचे बुरखा फाटल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच महापालिकेच्या कारभाराबाबत दै.सकाळमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचे कात्रणही त्यांनी यावेळी दाखविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT