अकरावी ‘कॅप’ फेरीचे
वेळापत्रक जाहीर
८ मेपर्यंत सात लाख ७४ हजार ९१८ विद्यार्थ्यांची नोंदणी
मुंबई, ता. ८ : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नियमित ‘कॅप फेरी-१’चे वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-२ भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दरम्यान, अर्जाचा भाग-१ भरून शुक्रवारपर्यंत सात लाख ७४ हजार ९१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.
अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरावेत, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित फेऱ्या, ओपन टू ऑल चौथी फेरी, मुलींसाठी विशेष पाचवी फेरी घेण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी support@mahafyjcadmissions.in या ई-मेलवर संपर्क साधता येणार आहे. ८५३०९५५५६४ हा हेल्पलाइन क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.