पुणे

ग्रामीण भागात वाहतूक शिस्तीसाठी दक्षिण पोलिसांची विशेष मोहीम; रस्त्यांवरील अडथळ्यावरही कारवाई होणार

CD

वाहतूक शिस्तीसाठी पोलिस ॲक्शन मोडवर
अक्कलकोट तालुक्यातील गावागावांत दक्षिण पोलिसांची मोहीम
सकाळ वृत्तसेवा
अक्कलकोट, ता. ११ : अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये वाहतूक शिस्त रुजविण्यासह रस्त्यांवरील अतिक्रमणे व अडथळे दूर करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात मोठ्या गावांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार असून वाहनधारकांनी स्वयंशिस्त पाळून इतरांच्या सुरक्षिततेचीही काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी केले.
पदभार स्वीकारल्यानंतर घुगे यांनी ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत मैंदर्गी येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १५ वाहनधारकांकडून सात हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आता नागणसूर, तोळणूर, जेऊर, अक्कलकोट स्टेशन, करजगी, पानमंगरूळ, तडवळ आणि दुधनी येथे मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेत वाहनांचे नियोजनबद्ध पार्किंग, रस्त्यांवरील अडथळे दूर करणे तसेच फेरीवाले व इतरांनी केलेली अतिक्रमणे स्वेच्छेने हटविण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. नियमभंग कायम राहिल्यास प्रसंगी कारवाईही केली जाणार आहे. आठवडे बाजाराच्या दिवशीही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यानंतर टप्प्या-टप्प्याने इतर गावांमध्येही ही मोहीम राबविली जाईल. दरम्यान, १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना वाहन चालविण्यास दिल्याचे आढळल्यास संबंधित मुलासह पालकांवरही कारवाई केली जाईल, असा इशारा घुगे यांनी दिला.
---
कोट
JEU26B08218
अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व मोठ्या गावांमध्ये वाहतूक शिस्त, योग्य पार्किंग आणि रस्त्यावरील अडथळे दूर करण्याबाबत नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा. मोहिमेदरम्यान नियमभंग आढळल्यास कारवाई करण्यात येईल. स्वतः सुरक्षित राहून इतरांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही प्रत्येकाने घ्यावी.
- विनोद घुगे, पोलिस निरीक्षक, अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचाही यादीत समावेश; मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा निर्णय

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

Marathi News Live Updates: १७ डिसेंबरनंतर बघू, सरकारला जरांगे पाटलांचा थेट इशारा; तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर पुढची भूमिका काय?

Community Book Bank: ममदापुरात लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेत बुक बँक सुरू; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अवांतर वाचनाचे नवे दालन

SCROLL FOR NEXT