प्रजासत्ताक दिन sakal
पुणे

Baramati News : अक्षय काकडेनी प्रजासत्ताक दिनाच्या परेडवरील सुखोईचे केले सारथ्य

प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथील परेडदरम्यान वायुदलाच्या सुखोई एमकेआय 30 या विमानांनी कर्तव्यपथावरुन उत्तुंग भरारी घेतली.

मिलिंद संगई, बारामती.

बारामती- प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथील परेडदरम्यान वायुदलाच्या सुखोई एमकेआय 30 या विमानांनी कर्तव्यपथावरुन उत्तुंग भरारी घेतली. या तीन सुखोई विमानांपैकी एका विमानाचे सारथ्य बारामतीचे स्क्वाड्रन लिडर अक्षय प्रमोद काकडे यांनी केले. ग्रुप कँप्टन ए. धनकर व विंग कमांडर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अक्षय काकडे यांनी सलामी दिली. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी भारतीय वायुदलाच्या सामर्थ्याचे प्रदर्शन देशवासियांना घडविले जाते.

यंदा वायुदलाच्या तीन सुखोई विमानांनी हवेत झेप घेत त्रिशूल फॉर्मेशन घडविले. या साठी अत्यंत मेहनत व सराव करावा लागतो. यंदा बारामतीकर अक्षय काकडे यांनी एका सुखोईचे सारथ्य करत देशवासियांना भारतीय वायुदलाचे सामर्थ्य दाखवून दिले. बारामतीकरांनी सर्वच क्षेत्रात आपला नावलौकीक प्रस्थापित केलेला आहे. अवघ्या सत्तावीस वर्षांच्या अक्षय काकडे यांनीही आज वायुदलात आपल्या कौशल्यावर प्रवेश प्राप्त करत स्क्वाड्रन लिडरपर्यंतची मजल मारली आहे.

फ्लाईंग ऑफिसर ते स्क्वाड्रन लिडरपर्यंतचा प्रवास त्यांनी काही वर्षात पार केला आहे. अक्षय यांना नुकतेच वायुसेना अध्यक्ष प्रशंसा पदक प्राप्त झाले होते.

अक्षय यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बालविकास मंदीरमध्ये झाले. एक दिवस शाळेची सहल खडकवासल्याच्या एन.डी.ए. (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी) मध्ये गेली होती. तेथील जीवन पाहून प्रभावित झालेल्या अक्षय यांनी येथेच दाखल होण्याची जिद्द बाळगली.

परिक्षा दिल्यानंतर, अत्यंत खडतर प्रशिक्षणात टिकून राहत पदवी प्राप्त केली. लहानपणापासूनच देशासाठी काहीतरी करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते.एनडीए मधील प्रशिक्षणानंतर हैदराबाद्च्या एअरफोर्स अँकेडमीमध्ये दाखल होत वर्षभराचे प्रशिक्षण प्राप्त केल्यानंतर वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी भारतीय वायुदलातील लढाऊ विमाने चालविणारा फ्लाईंग ऑफिसर म्हणून त्याची नियुक्ती झाली होती.

इतक्या तरुण वयात लढाऊ विमाने उडविण्याची संधी मिळणे ही बाब स्वप्नवतच होती परंतु वडील उद्योजक प्रमोद काकडे व आई संगीता काकडे यांच्या प्रेरणेने अक्षयने ही गगनभरारी मारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune RTO: ''पुण्याची ओळख कायम राहणार'', 'MH 12'साठी मुरलीधर मोहोळ नितीन गडकरींच्या भेटीला; म्हणाले...

Cyber Fraud : निर्मला सीतारामन यांच्या डीपफेक व्हिडिओचा गैरवापर; पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल एक कोटी सात लाखांची ऑनलाइन फसवणूक

Kolhapur Blast: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा स्फोट; नागरिकांमध्ये भीती, पोलिस घटनास्थळी दाखल

Pradeep Rawat: 'गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Solapur Pune Highway Incident: शिवशाही बसचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने सोलापूर-पुणे महामार्गावरील मोठा अनर्थ टळला, १४ प्रवासी सुखरूप

SCROLL FOR NEXT