Akshaya Tritiya Muhurta buy gold after price hike pune
Akshaya Tritiya Muhurta buy gold after price hike pune esakal
पुणे

Akshaya Tritiya : भाववाढीनंतरही ग्राहकांची सोने खरेदीला पसंती

सकाळ वृत्तसेवा

पुणे : साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे यंदा मागील वर्षाच्या तुलनेत भावात २० टक्के वाढ असतानाही नागरिकांनी सोने खरेदीसाठी गर्दी केली होती.

शनिवार आणि त्याचबरोबर सार्वजनिक सुटीमुळे सकाळपासूनच ग्राहकांनी पेठांमध्ये सोने खरेदीसाठी गर्दी केली होती. वर्षभर खरेदीचा आनंद अक्षय्य राहावा म्हणून मुहुर्त साधणाऱ्या पुणेकरांनी मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ५ टक्के अधिक सोने खरेदी केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मागील वर्षी अक्षय्य तृतीयेला ५० हजार ८०० रूपयांवर असलेले सोने यंदा ६१ हजार रूपये प्रती तोळ्यावर येवून पोचले आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या दृष्टीने ही दरवाढ आवाक्याबाहेर होती. सोन्याचे दर गगनाला भिडले असल्याने अनेक ग्राहकांनी कमी प्रमाणात का होईना सोने खरेदी करून हा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यात ईद आणि अक्षय्य तृतीया एकत्र आल्याने बाजारपेठांमध्ये गर्दी पाहायला मिळाली. विशेष करून लक्ष्मी रस्त्यावरील सोन्या मारुती चौकातील सराफ बाजार गजबजून गेला होता. सराफ व्यावसायिकांनी जाहीर केलेल्या विविध आकर्षक सवलतींचा लाभ नागरिकांनी घेतला.

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सोन्याचे भाव जवळपास २० टक्क्यांनी वाढले होते. परंतू, चांगल्या मुहुर्तावरील खरेदीसाठी ग्राहकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. कमी वजनाच्या दागिन्यांसह नैसर्गिक हिरे, १८ आणि २४ कॅरेटच्या दागिण्यांना विशेष मागणी होती. पाच वर्षांत जवळपास दुप्पट परतावा देणाऱ्या सोन्याकडे नागरिक सुरक्षित गुतंवणूक म्हणून पाहत आहे. यंदा रूपयांमध्ये होणारी उलाढाल २५ टक्क्यांनी वाढेल असा अंदाज आहे.

- अमित मोडक, मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएन गाडगीळ ॲन्ड सन्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता परतले विजयी मार्गावर, सॉल्टच्या तुफानी अर्धशतकानंतर दिल्लीवर मिळवला सोपा विजय

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT