Alandi
Alandi 
पुणे

आळंदीत रंगला माउलींचा रथोत्सव

विलास काटे

आळंदी (पुणे) : रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांची मुक्त उधळण, टाळ-मृदंगाच्या साथीने अखंड नामघोष अशा भक्तिमय वातावरणात वारकऱ्यांनी माउलींचा लाकडी रथ नगरप्रदक्षिणेसाठी रविवारी सायंकाळी साडेसहाला ओढला. तुळशीच्या हारांनी सजविलेले रथामधील माऊलींचे लोभस रूप प्रदक्षिणा रस्त्याच्या दुतर्फा उभ्या हजारो भाविकांनी डोळ्यात साठविले.

एकादशीला माउलींच्या संजीवन समाधीचे दर्शन, रविवारी पहाटेपासून द्वादशीचे इंद्रायणी स्नान आणि रथोत्सवाचा आनंद घेत वारकरी भजन कीर्तनात दंग होते. माऊलींची पालखी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास मुख्य मंदिरातून नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडली. माउलींचा आकर्षक चांदीचा मुखवटा ठेवलेली पालखी आळंदीकरांनी खांद्यावर घेतली आणि महाद्वार शनिमंदिर, झाडीबाजार, चाकण चौक मार्गाने गोपाळपुरात आणली. यावेळी दर्शनासाठी दुतर्फा गर्दी होती.

गोपाळपुरात पालखी आल्यानंतर येथील गोपालविष्ण्‌ृ मंदिरात पालखी विसावली. विवेक इनामदार कुटुंबीयांनी मुख्यवट्याचे विधिवत पूजन केले. या वेळी बाळासाहेब चोपदार, रामभाऊ चोपदार, राजाभाऊ चोपदार, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ चौधरी, दत्तोपंत केसरी उपस्थित होते. गोपालकृष्ण मंदिरात पूजन झाल्यानंतर माउलींचा मुखवटा रथात ठेवण्यात आला. पुजारी राजाभाऊ चौधरी आणि दत्तोपंत केसरी यांनी माउलींच्या मूर्तीची आकर्षक सजावट केली. सजावटीनंतर आरती करून रथ गोपाळपुरातून प्रदक्षिणेसाठी पुढे साडेसहाला मार्गस्थ झाला. साडेसहाच्या सुमारास निघालेल्या रथोत्सवात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

Latest Marathi News Live Update: तामिळनाडूमध्ये बसचा अपघात; १५ जखमी

Tesla Layoffs: इलॉन मस्कच्या कंपनीत चाललंय काय? आणखी काही कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT