पुणे

आळंदीत भरदिवसा रिक्षाचालकावर खंजिराने हल्ला

CD

आळंदी, ता. १३ : पूर्ववैमनस्यातून रिक्षाचालक सागर दत्तात्रेय बडे (वय २२) यांच्यावर तिघांनी खंजिराने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. १३) सकाळी अकराच्या सुमारास नगर परिषद कार्यालयासमोर घडली. या हल्ल्यात बडे गंभीर जखमी झाले असून, मुख्य हल्लेखोर आर्यन नागोराव पंडित व त्याच्या दोन साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर बडे (रा. अण्णाभाऊ साठेनगर, काटे कॉलनी, देहू फाटा) हे नगर परिषद कार्यालयासमोरील पीएमपीएमएल बसस्थानकाजवळ आपल्या रिक्षासह उभे होते. त्यावेळी मागील भांडणाच्या वादातून आर्यन नागोराव पंडित (रा. केळगाव) आणि त्याचे दोन साथीदार तेथे आले. त्यांनी बडे यांना मारहाण करण्यास सुरुवात करताच बडे यांनी जीव वाचवण्यासाठी पळ काढला. हातामध्ये खंजीर घेऊन हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग केला.
नगर परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वार कमानीमध्ये हल्लेखोरांनी सागर यांना गाठले आणि त्यांच्यावर खंजिराने सपासप वार केले. यासोबतच त्यांना लाथाबुक्क्यांनीही बेदम मारहाण करण्यात आली. पुणे-पिंपरीला जाणारे प्रवासी, महिला, विद्यार्थी आणि भाविकांच्या गर्दीसमोर हा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली. अनेक जण भयभीत झाले होते. रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत सागर यांनी रस्ता ओलांडून एका हॉटेलच्या दारात आश्रय घेतला व मदतीसाठी याचना करू लागले. याची माहिती मिळताच आळंदी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना तातडीने पिंपरी-चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह
आळंदी नगर परिषद कार्यालय आणि स्मशानभूमी परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांचा नेहमीच वावर असतो. या भागात पोलिसांची गस्त कमी असल्याने गुन्हेगारांचे फावत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक करतात. पोलिसांचा यावर कोणताही वचक नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारच्या घटनेचा संपूर्ण थरार एका रिक्षाचालकाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला असून, या व्हिडिओमुळे हल्लेखोरांची क्रूरता समोर आली आहे. या प्रकारामुळे आळंदीतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार....
हल्लेखोर मजूर म्हणून काम करत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी आर्यन पंडित आणि त्याच्या दोन साथीदारांचा पोलिस कसून शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Touch Wood Tradition: 'टच वुड' म्हणताच लाकडाला हात का लावतात? जाणून घ्या यामागचं रंजक कारण

Global Indian CEOs : जगातील २०० दिग्गज कंपन्यांच्या तिजोरीची चावी भारतीयांच्या हाती! 'या' २३६ जणांचे वर्चस्व, महाराष्ट्र देशात अव्वल!

Latest Marathi News Live Update: एसबीआयच्या ग्लोबल आयटी सेंटरवर सायबर हल्ला

भीषण अपघात! बस कंटेनर ट्रकवर आदळली; २३ प्रवाशांचा मृत्यू; बचावकार्य सुरू

Drought Relief: दुष्काळात शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत, भूमिहीन मजुरांचे काय? उच्च न्यायालयाने राज्य सरकारला काय दिले निर्देश?

SCROLL FOR NEXT