पुणे

मावळमधील २१ गावांना मूल्यांकन समितीची भेट

CD

वडगाव मावळ, ता. १८ : ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत अलिबाग पंचायत समितीच्या तालुकास्तरीय मूल्यमापन समितीने नुकतीच मावळ तालुक्यातील २१ गावांची पाहणी करून मूल्यांकन केले.
हे अभियान १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत पार पडले असून, यासाठी सुमारे ३०० कोटी रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका अशा विविध स्तरांवर ग्रामपंचायतींना एकूण १२ प्रकारची पारितोषिके दिली जाणार असून, राज्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या ग्रामपंचायतीला ५ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे.
अलिबाग पंचायत समितीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा मूल्यमापन समितीच्या अध्यक्षा शुभांगी नाखले, समितीचे सदस्य चंद्रशेखर धुमाळ, राजेश घरत, हंसराज कोकार्डे, केतुल पाटील, विनोद पाटील आदींचा समितीमध्ये समावेश होता. त्यांनी मावळ तालुक्यातील इंदोरी, जांभूळ, भोयरे, कान्हे, सुदुंबरे, देवले, सोमाटणे, दारुंब्रे, उर्से, शिरगाव, महागाव, मुंढावरे, वरसोली, कार्ला, नवलाख उंब्रे, माळेगाव बुद्रुक, वाकसई, परंदवडी, धामणे, कुणेनामा आणि करंजगाव या गावांना भेटी दिल्या.
या भेटीदरम्यान सुशासनयुक्त पंचायत, आर्थिकदृष्ट्या सक्षम पंचायत, जलसमृद्ध व स्वच्छ-हरित गाव, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, ग्रामस्तरावरील संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास, सामाजिक न्याय तसेच लोकसहभाग व श्रमदानातून उभारलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. मावळ पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी सेवक थोरात, कृषी अधिकारी संताजी जाधव, पशुधनविकास अधिकारी डॉ. कैलास चोलकर, विस्तार अधिकारी अरुण सोळंकी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी या पाहणी दौऱ्याचे नियोजन करून गावांमध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती समितीसमोर मांडली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara IT Park : कोल्हापूर-साताऱ्यात आयटी पार्कचा मार्ग मोकळा, म्हसवड MIDC साठीही तब्बल 500 कोटी; मंत्री उदय सामंत यांचा मोठा निर्णय

Satara District bank Election : सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत मंत्री जयकुमार गोरेंच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांचा सावध पवित्रा

Uday Samant : यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राज्यात स्वतंत्र अनुवाद समिती स्थापन करणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

वरिष्ठ IAS अधिकारी बेपत्ता, मोबाईही बंद; शेवटचं लोकेशन बंगळुरु विमानतळावर

Nagpur News : नऊ दिवसांपासून नवजात बालिकेच्या शोधात फिरत होती महिला; मुलगी मेल्याने होती अस्वस्थ, रिक्षामधून उडी मारण्याचाही प्रयत्न

SCROLL FOR NEXT