All government employees in state are indefinite strike from March 14 pune esakal
पुणे

Pune News : राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी येत्या १४ मार्चपासून बेमुदत संपावर

संपामध्ये सर्व सरकारी कार्यालये, महसूल, जिल्हा परिषद, शिक्षक,शिक्षकेत्तर, निमसरकारी आणि कंत्राटी आदी सर्व संवर्गातील कर्मचारी सहभागी होणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील सरकारी कर्मचारी हे त्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. या संपामध्ये सर्व सरकारी कार्यालये, महसूल, जिल्हा परिषद, शिक्षक,शिक्षकेत्तर, निमसरकारी आणि कंत्राटी आदी सर्व संवर्गातील कर्मचारी सहभागी होणार आहेत. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष मारुती शिंदे यांनी शुक्रवारी (ता.२४) याबाबतची घोषणा केली.

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व विविध शासकीय कर्मचारी संघटना समन्वय समिती यांच्यावतीने हा संप पुकारण्यात आला आहे. या संपाच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून शुक्रवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. पुणे जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष मारुती शिंदे, आरोग्य विभागातील नंदकुमार गुडमेट्टी, संजय कडाळे, ससून रुग्णालयातील दिनेश कुचेकर, पाटबंधारे विभागातील कृष्णा साळवी, सहकार विभागातील संध्या काजळे, प्रादेशिक परिवहन कार्यालयातील महेश घुले, जिल्हाधिकारी कार्यालयातील विनायक राऊत, निर्मला चौधरी, आशा बांदल आदी विविध विभागातील कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Tensions : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आता भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका!

Midday Meal Egg Controversy : मध्यान्ह भोजनात अंडे देण्यावरून वाद...एकाच वेळी ७० पालकांनी मुलांना शाळेतून काढलं

VIRAL VIDEO: ए काय करतोयस? सेल्फी घेणाऱ्याला जया बच्चन यांनी दिला जोराचा धक्का; सगळेच अवाक, नेटकरी म्हणतात- त्याला...

Latest Maharashtra News Updates Live: वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडेंचंच वर्चस्व

मृत्यूच्या दाढेतून परत आलेली सचिन यांची एकुलती एक लेक; "डॉक्टरांनी ती टेस्ट सांगितल्यावर मी हादरलो.."

SCROLL FOR NEXT