pm.jpg
pm.jpg 
पुणे

'रिक्षा, कॅब परवडेना! वैद्यकीय कारणासाठी तरी पीएमपीच्या बसमध्ये बसू द्या' 

सकाळवृत्तसेवा

पुणे ः बाळकृष्ण जाधव (वय 58) यांचा रक्तदाब वाढला. तपासणीसाठी त्यांना एरंडवण्यातील एका रुग्णालयात जायचे. रिक्षा- कॅबचे भाडे 300 रुपयांपेक्षा जास्त... पीएमपीची बस त्याच मार्गावर जाणारी... पण त्यात प्रवेश नाही, त्यामुळे रुग्णालयात जायचे कसे, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. किमान वैद्यकीय कारणास्तव तरी बसमध्ये बसून द्या... पण पीएमपी प्रशासन त्याला काही जुमानत नाही...

शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीची अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांसाठी बससेवा सुरू आहे. त्यात सुमारे 125 बस रोज धावत आहेत. पण, या बसमध्ये वैद्यकीय कारणास्तव प्रवास करायचा असेल तर, प्रवेश नाकारला जातो. त्याला नागरिकांचा विरोध आहे. वैद्यकीय कारणास्तव प्रवेश द्या, अशीच त्यांची मागणी आहे.

जाधव यांना तपासणीसाठी जायचे असल्यामुळे सातारा रस्त्यावरून शुक्रवारी सकाळी बसमध्ये बसण्याचा प्रयत्न केला. परंतु, कंडक्टरने प्रवेश नाकारला. त्यांनी रिक्षासाठी चौकशी  केल्यावर सुमारे 300 रुपये भाडे त्यांना सांगण्यात आले. जाधव यांनी त्यांची कैफीयत  सकाळकडे मांडली. डॉक्टरांचे 500 रुपये, रिक्षाचे 300 रुपये कसे परवडणार, बसमधून गेलो असतो तर 40 रुपयांत जाऊन आलो असतो. किमान मेडिकलच्या कारणास्तव तरी बसमध्ये प्रवेश करू द्या., असे त्यांचे म्हणणे आहे. 

आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत यांनीही वैद्यकीय कारणास्तव नागरिकांना घराबाहेर पडायचे असेल तर, पीएमपीच्या बसमध्ये प्रवेश द्यायला हवा, असे मत व्यक्त केले. कामगारांना दुचाकी वापरण्यासाठी परवानगी दिली तर गरजूंना बस प्रवास का करू देत नाही, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

या बाबत पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांना विचारणा केली असता, वैद्यकीय कारणास्तव पीएमपीमधून बस प्रवास करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून आमच्याकडे होत आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून त्या बाबत विचार सुरू आहे. या बाबत पीएमपीच्या वरिष्ठ अधिकाऱयांशी बोलून तातडीने निर्णय घेतला जाईल.

Editied by : Sagar Shelar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT