पुणे

अंबवडे बुद्रुकमध्ये शिवकालीन आरमाराचा वारसा नव्या पिढीसमोर

CD

अंबवड्यात शिवकालीन जहाजांचे प्रदर्शनही

आरमाराचा वारसा नव्या पिढीसमोर; खटावच्या कुमार गुरव यांची संकल्पना

अमर वांगडे : सकाळ वृत्तसेवा
परळी, ता. १३ : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संरक्षणासाठी सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी उभारलेल्या बलशाली आरमाराचा इतिहास नव्या पिढीला समजावा, या उद्देशाने अंबवडे बुद्रुक येथे शिवकालीन जहाजांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. खटाव येथील कुमार गुरव यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नऊ जहाजांच्या प्रतिकृती हे या प्रदर्शनाचे आकर्षण ठरत असून, या माध्यमातून मराठ्यांच्या सागरी सामर्थ्याचा इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
गुरव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आरमाराचा आठ वर्षे अभ्यास केला. त्यानंतर गेल्या दोन ते तीन वर्षांपासून त्यांनी ऐतिहासिक जहाजांच्या प्रतिकृती साकारण्यास सुरुवात केली. केवळ जहाजांचा आकार तयार करण्यापुरते मर्यादित न राहता त्या काळातील जहाजांची बांधणी, रचना, वैशिष्ट्ये आणि त्यामधील बारकावे अभ्यासून त्यांनी या प्रतिकृती तयार केल्या आहेत.
अंबवडे बुद्रुक येथील किल्ल्यांच्या प्रदर्शनात नऊ जहाजांचा समावेश केला आहे. यामध्ये मराठा आरमारातील चार, शत्रूराष्ट्रांच्या आरमारातील दोन, तसेच भारतीय नौदलातील आयएनएस विक्रांतसारख्या युद्धनौकांच्या प्रतिकृतींचा समावेश आहे.
या प्रदर्शनात सुमारे एक हजार वर्षांपूर्वी चोल राजवटीच्या काळातील जहाजाची प्रतिकृती आहे. या माध्यमातून मराठा आरमाराबरोबरच भारतीय सागरी इतिहासातील विविध कालखंडांची माहितीही मिळत आहे. याशिवाय सागरी किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे फलकही प्रदर्शनात लावण्यात आले आहेत.
.........................................
चौकट
------
हे एकदा पाहाच!
-----------
कुमार गुरव यांनी मराठा आरमारातील सर्वांत छोटी युद्धनौका गलबत, त्यापेक्षा मोठी गुराब आणि सर्वांत मोठी युद्धनौका पाल यांच्या प्रतिकृती साकारल्या आहेत. सुमारे एक फूट आकारापासून ते साडेचार फूट लांबीपर्यंतच्या या प्रतिकृतींमध्ये जहाजांच्या रचनेतील बारकावे अचूकपणे दाखविण्यात आले आहेत. त्यामुळे इतिहासप्रेमींसह विद्यार्थी आणि नागरिकांनाही हे प्रदर्शन आकर्षित करीत आहे.

............................................
चौकट

किल्ल्याच्या गावाला यात्रेचे स्वरूप
-----------
गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने भरविण्यात येणाऱ्या किल्ल्यांच्या प्रदर्शनामुळे आंबवडे बुद्रुक गावाला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. दिवाळीच्या सुट्यांमध्ये येथील किल्ले पाहण्यासाठी जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांतील नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. प्रदर्शनातील आकर्षक किल्ल्यांची मांडणी, ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती तसेच बालमावळ्यांचे सादरीकरण नागरिकांच्या पसंतीस उतरत आहे. इतिहासाचा वारसा जपणाऱ्या या उपक्रमामुळे अंबवडे बुद्रुकची ओळख जिल्ह्याबाहेरही पोहोचली आहे.

................................................
कोट -
अंबवडे बुद्रुक येथील किल्ले प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मुलांकडून उभारलेले गडकिल्ले नागरिकांना भुरळ घालत आहेत. पुणे, कोल्हापूर, सांगली, कऱ्हाड यांसारख्या शहरांतील नागरिकही किल्ल्यांच्या गावाला भेट देत आरमाराच्या प्रदर्शनाचा अनुभव घेत आहेत.
- कुमार गुरव
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashi Tharoor: भारत समिटमध्ये 115 परदेशी वक्त्यांना प्रवेश नाकारला; शशी थरूर यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

IND vs NZ 4th ODI: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये Unplayable Deliveries असं काही नसतं, फलंदाजानं...; ८९ ऑल आऊटनंतर गौतम गंभीरकडून कानउघडणी

Thane Water Cut: ठाण्यात पुन्हा पाण्याचा ठणठणाट! सोमवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; कोणत्या भागांना फटका?

वर्षा उसगांवकर यांचे पती कोण आहेत? सोशल मीडियावर एकही एकत्र फोटो का पोस्ट करत नाहीत? अभिनेत्रीने सांगितलं कारण!

Latest Marathi News Live Update : मुंबईतील मिठी नदीजवळ नाल्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT