ambulance tender scam of 6 thousand cr by tanaji sawant revealed rohit pawar Sakal
पुणे

Pune : रुग्णवाहिका टेंडर प्रकरणात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून साडे सहा हजार कोटींचा घोटाळा - रोहित पवार

आदिवासी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या दूध, भोजनात भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारमधील मंत्र्यांनी लोकांचा जीव वाचवणाऱ्या रुग्णवाहिकामध्ये भ्रष्टाचार करण्याचे सोडले नाही.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : आदिवासी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या दूध, भोजनात भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारमधील मंत्र्यांनी लोकांचा जीव वाचवणाऱ्या रुग्णवाहिकामध्ये भ्रष्टाचार करण्याचे सोडले नाही. आरोग्य विभागाने रुग्णवाहिका पुरवठा करणाऱ्या सुमित व बीव्हीजी या कंपनीला नियमबाह्य पद्धतीने टेंडर देण्यात आले.

त्याद्वारे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी साडे सहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे, असा गौप्यस्फोट आमदार रोहित पवार यांनी सोमवारी केला. सक्तवसुली संचालनालयाने (इडी) बारामती अग्रो कंपनी वरील कारवाईनंतर पवार यांनी सरकार विरोधात आवाज उठवण्यास सुरवात केली.

राज्यातील मंत्री दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांच्यावर दूध, भोजन प्रकरणात पवार यांनी पहिल्या पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले होते. त्यापाठोपाठ सोमवारी दुसऱ्या पत्रकार परिषदेत त्यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधत आरोग्य विभागातील भ्रष्टाचार संबंधी गंभीर आरोप केले.

पवार म्हणाले, "निवडणुकीला फंड देण्यासाठी बीव्हिजी आणि सुमित कंपनी यांच्यावर मेहरबानी दाखवली जात आहे. हा लढा सामान्य व्यक्तीचा असून नियम कसे वळविण्यात आले, टेंडर डिझाईन करून वळवले गेले.

या भ्रष्टाचाराबाबत आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. त्यामध्ये आरोग्य विभागातील मोठ्या लोकांनी साडे सहा हजार कोटीचा घोटाळा केला आहे. या पैशाचा वापर निवडणुकीसाठी करण्याचा प्रयत्न आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी हा घोटाळा केला असून राज्याला भिखारी केले आहे. सरकारने त्यांची सखोल चौकशी केली करावी, सावंत यांनी राजीनामा दिला पाहिजे."

पवार म्हणाले, "स्वच्छता काम टेंडर मध्ये अचानक मोठ्या प्रमाणात वाढवले गेले. राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी स्पॅनिश कंपनी यांना टेंडर दिले गेले होते. त्यांच्या सोबत करार करण्यात आला. टेंडर हे सुमित कंपनी यांनी डिझाईन केले आणि त्यांनाच मिळाले.

त्यांना स्वच्छतेच्या कामाचा अनुभव नसताना ही नियमबाह्य पद्धतीने त्यांना रुग्णवाहिका सेवा पुरवण्याचे कंत्राट दिले गेले. तेव्हा, त्यांच्याविरुद्ध तक्रार करणाऱ्या बीव्हिजी कंपनीला ही नाराज न करता त्यांना देखील टेंडरमध्ये सामावून घेण्यात आले आहे. पिंपरी चिंचवडमधील अमित साळुंखे नावाच्या व्यक्तीची सुमित कंपनी आहे.

या प्रकरणात साडे सह हजार कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला. हाच पैसा निवडणूक निधी म्हणून देण्यात आला आहे." सावंत यांना मी पाच दिवसाचा वेळ देतो त्यांनी आपली बाजू मांडावी. आरोग्य विभाग हा खेकडा पोकरत असून पारदर्शक प्रक्रिया राबवावी असा टोला त्यांनी लगावला.

खेकडा महाराष्ट्राला पोखरतोय

तानाजी सावंत यांनी " खेकड्याने पोखरल्याने धरणांना गळती लागते" असे विधान केले होते, या विधानावरून पवार यांनी सावंत यांना धारेवर धरले. पवार म्हणाले, " सावंत यांच्याकडून रुग्णवाहिका प्रकरणात साडे सहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे.खेकडा वळवळ करतो. धरण पोखरतो. बिळात जावून बसतो. लोकांचं लक्ष कमी झालं की पुन्हा बाहेर येतो. खेकडा महाराष्ट्राला पोखरतोय."

पवार म्हणाले

- कॅबिनेट बैठकीत जे विषय ठरले गेले सांगण्यात आले, प्रत्यक्षात ते लेखी मिनिटमध्ये दिसत नाहीत.

- आरोग्य मंत्री हाफकिन संस्था ओळखण्यात गल्लत करतात, पण पैसे खाण्यात गल्लत करत नाहीत

- रुग्णवाहिका खरेदीसाठी दोनदा टेंडर काढण्यात आले

- मार्केट रेट पेक्षा दुप्पट किंमतीने रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या

- सुमित फॅसिलिटी, बीव्हीजी, एसएसजी या कंपन्यांना कंत्राट देण्यात आले

- बीव्हीजीला कंत्राट देण्यासाठी दिल्लीतील नेत्याकडे लॉबिंग.

- सत्तेतील एक मोठी व्यक्ती आणि त्यांचा मुलगा पाठीशी आहे. या प्रकरणाची सरकारने याची चौकशी लावावी

- अनेक देशांनी ब्लॅकलिस्ट केलेल्या एसएसजी कंपनीला ही कंत्राट दिले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ; 10 ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतील इतके पैसे

पोस्टाची ५० वर्षे जुनी सेवा बंद, रजिस्टर्ड पोस्ट ऐवजी आता स्पीड पोस्ट; खर्च वाढणार

'दादा, यावेळी मी तुला राखी बांधू शकणार नाही'; २४ वर्षीय नवविवाहित प्राध्यापिकेनं चिठ्ठी लिहून संपवलं जीवन, पती-सासरकडून होत होता छळ

Latest Maharashtra News Updates Live : पुण्यातील गणेश मंडळांची बैठक सुरू

लग्न न करताच बाबा होणार 'सैराट' फेम अभिनेता? गर्लफ्रेंडने शेअर केले बेबी शॉवरचे फोटो, आईचा विरोध होता म्हणून...

SCROLL FOR NEXT