पुणे

पंतप्रधानांच्या आवाहनाला भाजपचाच हरताळ

CD

पाहणी दौऱ्यात २५ गाड्यांचा ताफा!
भाजप नेते अमित साटम यांच्यावर विरोधकांची टीका
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १२ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला इंधन बचतीचे आणि काटकसरीचे आवाहन करून दोन दिवस उलटत नाहीत, तोच मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी या शिस्तीला हरताळ फासला आहे. मुंबईतील नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यासाठी साटम यांनी २५ गाड्यांचा अवाढव्य ताफा वापरल्याने राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर तीव्र टीका होत आहे. ‘जनतेला त्यागाचे सल्ले आणि स्वतःला मात्र शाही थाट,’ अशा शब्दांत विरोधकांनी साटम यांच्या भूमिकेचा पंचनामा केला आहे.
​अमित साटम यांनी मंगळवारी मुंबई उपनगरांमध्ये नालेसफाईचा आढावा घेतला. या दौऱ्याचे स्वरूप एखाद्या राजकीय मिरवणुकीसारखे होते. साटम यांच्या स्वतःच्या वाहनांसह या ताफ्यात आमदार, माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांची लांबलचक रांग होती. एका बाजूला सामान्य नागरिक महागाई आणि इंधन दरवाढीने होरपळत असताना सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षांनी नालेसफाईसारख्या कामासाठी अशा प्रकारे इंधनाची उधळपट्टी करणे म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
विरोधकांचे टीकास्त्र
या दौऱ्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अमित साटम यांच्यावर हल्ला केला. ‘पंतप्रधानांचा सल्ला फक्त सामान्य माणसानेच पाळायचा का, साटम यांना इंधन बचतीचा विसर पडला आहे की ते सत्तेच्या नशेत आहेत,’ असा सवाल वर्षा गायकवाड यांनी विचारला, तर रोहित पवार यांनी या ताफ्यावर खोचक टिप्पणी करत, ‘बहुधा यांच्या गाड्या पाण्यावर चालत असाव्यात,’ असा टोला लगावला.
​दरम्यान, टीकेनंतर अमित साटम यांनी ‘आमचा दौरा वसुलीसाठी नाही तर सुरक्षेसाठी आहे,’ असा दावा केला असला, तरी २५ गाड्यांच्या ताफ्याचे समर्थन करताना त्यांची दमछाक होताना दिसली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Action: डॉमिनोजनंतर तुकाराम मुंढेंचा झेप्टो, इन्स्टामार्टसह फ्रुटीवर प्रहार; ११ तास छापेमारी, १४ परवाने निलंबित

BSNL ग्राहकांना स्वातंत्र्य दिनाची 'डिजिटल भेट', एक रुपयात मोबाइल सेवा; २५ हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म

PM Modi Mental Naxalism Statement : 'नक्षलवादाने तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले'; मानसिक नक्षलवादाला ठेचल्याशिवाय भारत विकसित होणार नाही, पीएम मोदींचा जोरदार हल्ला

Independence Day Live Update : पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण, चंद्रकांत खैरेंचा कानमंत्र; दानवेंची गळाभेट चर्चेत

D.B. Dhamanaskar: ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर यांचे निधन

SCROLL FOR NEXT