Amol Kolhe
Amol Kolhe sakal
पुणे

Amol Kolhe : शेतकऱ्याच्या पोराला पाडण्यासाठी अनेक दिग्गज मतदारसंघात ; पण नागरिक माझ्या पाठीशी ,डॉ कोल्हे

सकाळ वृत्तसेवा

वाघोली : शेतकऱ्याचा पोरगा खासदारकीला उभा आहे. त्याला पाडण्यासाठी मुख्यमंत्री, दोन दोन उपमुखमंत्र्या सारखे दिग्गज मतदार संघात वारंवार येत आहेत. यावरूनच विरोधकांची काय स्थिती आहे. हे दिसते आहे. पण हा शेतकऱ्याचा पोरगा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी संसदेत जात आहे. त्यामुळे जनताही उत्स्फूर्त साथ देत आहे. असा विश्वास शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.

डॉ कोल्हे यांनी रविवारी वाघोलीत सुमारे २५ सोसायट्या मध्ये नागरिकांच्या भेटी गाठी घेतल्या. या प्रसंगी ते बोलत होते. डॉ कोल्हे पुढे म्हणाले, वाघोलीचे अनेक प्रश्न आहेत. आमदार अशोक पवार ते सोडविण्यासाठी झटत आहेत. मुख्यतः पाणी, कचरा, ड्रेनेज हे खूपच गंभीर प्रश्न आहेत. ईलिव्हेटेड कॉरीडोवर मुळे पुणे नगर महामार्गावरील कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल.

मात्र मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी निवडणुकीनंतर महापालिका आयुक्तांकडे आम्ही पाठपुरवठा केल्याशिवाय राहणार नाही. वाघोलीकर जर कर भरत असतील तर त्यांना सुविधा मिळाल्याचं पाहिजे. त्यासाठी लढा देण्याची वेळ आली तरी देवू. असे आश्वासन ही डॉ कोल्हे यांनी दिले. डॉ कोल्हे यांनी वाघोली श्री जैन श्रावक संघाच्या सुरू असलेल्या स्थानक इमारतीची पाहणी करून जैन बांधवांशी संवाद साधला. या प्रसंगी आमदार अशोक पवार, शिवदास उबाळे, वसुंधरा उबाळे, जयश्री सातव, राजेंद्र सातव, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक खंडेभारड, संदीप गोते, बाळासाहेब सातव, स्वप्नील कुंजीर, स्मिता कडू, शैलेश पवार, राजू पाटील, अमोल मुळे, सचिन साबळे आदी उपस्थित होते.

डॉ कोल्हे यांचे रक्तदान

वढू बुद्रुक येथील श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळाला आज खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बलिदान दिनानिमित्त भेट दिली. यावेळी तेथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये रक्तदान शिबिराचाही समावेश होता. डॉ कोल्हे यांनी ही यावेळी रक्तदान केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT