Revenue
Revenue 
पुणे

दस्त नोंदणीतून तब्बल एका महिन्यात झाला एवढा महसुल जमा 

सकाळवृत्तसेवा

पुणे - तीन टक्के मुद्रांक शुल्काची सवलतीचा अखेरच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी फायदा घेतला. डिसेंबर महिन्यात राज्यात 4 लाख 59 हजार 607 दस्त नोंदविण्यात आले असून यातून राज्य शासनाला 4 हजार 31 कोटी रुपयांचा महसुल मिळाला आहे. एकाच महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर महसुल मिळाल्याचा आजपर्यंतचा हा उच्चांक ठरला आहे. तर मागील नऊ महिन्यात दस्त नोंदणीतून राज्य शासनाच्या तिजोरीत 14 हजार 598 कोटी रुपयांचा महसुल मिळाला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना व लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ झटकण्यासाठी राज्य शासनाने 1 सप्टेंबरपासून मुद्रांक शुल्कात तीन टक्‍क्‍यांची सवलत देण्यास सुरुवात केली. यामुळे घर खरेदीला चालना मिळाली. ही सवलत 31 डिसेंबरपर्यंत असल्यानेच या कालावधीत दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सुट्टीच्या दिवशीसुध्दा शहरातील कार्यालये सुरु ठेवण्यात आली होती. या सवलतींचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला. त्यामुळे डिसेंबर महिन्यात विक्रमी दस्त नोंदणी व महसुल मिळाला आहे. 

आता 2 टक्के सवलत 
दरम्यान दि. 1 जानेवारी ते मार्च 2021 मध्ये मुद्रांक शुल्कात 2 टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पुणे शहरात तसेच प्रभाव क्षेत्रांतील गावांमध्ये तीन टक्के मुद्रांक शुल्क आणि एक टक्का सेस ( एलबीटी) असे चार टक्केच मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. तर ग्रामीण भागात दोन टक्के मुद्रांक शुल्क आणि एक टक्का सेस असे तीन टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाणार आहे. 

मुद्रांक शुल्क सवलतीचा फायदा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घेतला. कोरोना काळात दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी होऊ नये, यासाठी शनिवारी या सुट्टीच्या दिवशीसुध्दा कार्यालये सुरु ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर ज्या कार्यालयांमध्ये सायंकाळपर्यंत गर्दी होती, अशा कार्यालयांची वेळ दोन तासांनी वाढविण्यात आली होती. यासर्व उपाययोजनांमुळे राज्यात डिसेंबर महिन्यात विक्रमी दस्त नोंदणी व महसुल जमा झाला आहे. 
- ओमप्रकाश देशमुख - नोंदणी महानिरिक्षक 

2020-21 या वर्षात राज्यात झालेली दस्त नोंदणी 
महिना - दस्त संख्या - जमा महसुल 

एप्रिल - 1139 -275 कोटी 
मे - 42,573 - 516 कोटी 
जून - 1,53,155 - 1 हजार 332 कोटी 
जुलै - 1,65,139 -1 हजार 373 कोटी 
ऑगस्ट - 1,83,515 - 1 हजार 479 कोटी 
सप्टेंबर - 2,47,609 - 1 हजार 642 कोटी 
ऑक्‍टोंबर 2,74,235 -1 हजर 910 कोटी 
नोव्हेंबर - 2,74,773 -1 हजार 754 कोटी 
डिसेंबर - 4,59,607 -4 हजार 314 कोटी 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT