Doctor
Doctor 
पुणे

गावाच्या आरोग्यासाठी ‘अनंत दीर्घायू’

ज्ञानेश्वर रायते

भवानीनगर - तुम्ही गावाच्या एका टोकाला वस्तीवर राहता आणि तुमच्या घरासमोर अचानक गुलाबी ॲप्रन घातलेली ‘आशा’ स्वयंसेविका येऊन तिने कुटुंबातील ज्येष्ठांचा किंवा अगदी तुमचाही रक्तदाब मोजला किंवा रक्ताची चाचणी घेऊन इन्स्टंट ‘ब्लड शुगर’ मोजली किंवा हिमोग्लोबिनचा रिपोर्ट सांगितला तर नवल वाटायचे काही कारण नाही. ग्रामीण भागाची आरोग्य कुंडली बळकट करून धकाधकीच्या आयुष्यातही सर्व स्तरातील नागरिकांचे आरोग्य मजबूत ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेची ‘अनंत दीर्घायू’ योजना लवकरच जिल्ह्याच्या सेवेत रुजू होतेय.

जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी आज ही माहिती ‘सकाळ’ला दिली. आरोग्याच्या बाबतीत गेल्या दोन वर्षात अनेकविध विधायक निर्णय घेत जिल्ह्याला राज्यात अग्रस्थानी नेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गुरुवारी (ता. १४) हे एक नवे महत्त्वाकांक्षी पाऊल टाकले. नव्या वर्षात आरोग्य आपल्या दारी अंतर्गत ‘अनंत दीर्घायू’ हे अभियान चालविले जाणार असून, त्यासाठी ७० लाखांचा खर्च 
अपेक्षित आहे. 

जिल्ह्यातील ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ५३९ उपकेंद्रांच्या कार्यकक्षेतील २८६० ‘आशा’ स्वयंसेविका जिल्ह्यातील १४१२ गावांमध्ये स्वयंस्फूर्तीने हे काम करणार आहेत. या योजनेतून आशा स्वयंसेविकांना गुलाबी रंगाचे ॲप्रन दिले जाणार असून, त्यांच्या नेहमीच्या कार्यकक्षेतील कुटुंबांची आरोग्य कुंडली तपासून एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्या काम करतील. 

या योजनेद्वारे अगदी वाड्यावस्त्यांपर्यंत रक्तदाब, मधुमेह व हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासण्याचे काम होणार आहे. याद्वारे त्या गावातील मधुमेहींची संख्या, हृदयविकार असलेल्या अथवा नुकताच त्रास सुरू झालेल्यांची संख्या निश्‍चित होण्यास मदत होईल. यातून आरोग्याचे अनेक प्रश्‍न सुटण्यास तसेच नेमक्‍या कोणत्या आरोग्य उपाययोजनांची त्या गावात गरज आहे हे स्पष्ट होण्यास मदत होईल.

मधुमेह व हृदयरोगाचे ग्रामीण भागात वाढत चाललेले प्रमाण विविध आरोग्य शिबिरांतून दिसून येत असल्याने समाजाच्या सर्व स्तरापर्यंत लोकांना आपल्या आरोग्याबाबत अधिक सजग करण्यासाठी ही योजना उपयोगी पडेल. ‘अनंत दीर्घायू’ हे अभियान केवळ पुणे जिल्ह्यालाच नव्हे तर राज्याला दिशादर्शक ठरेल, अशी आशा आहे.
- दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी 

‘अनंत दीर्घायू’ योजनेची व्याप्ती
  जिल्ह्यासाठी ७० लाखांचा खर्च अपेक्षित.
  १४१२ गावे
  ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ५३९ उपकेंद्रे समाविष्ट
  २ हजार ८६० आशांचा सहभाग
  हिमोग्लोबिन तपासणी, रक्तदाब व मधुमेहाचे प्रमाण तपासणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT