आंधळी सोसायटीच्या
अध्यक्षपदी सुरेश पवार
उपाध्यक्षपदी संतोष काळे; बिनविरोध निवडी
दहिवडी, ता. १२ : माण तालुक्यातील आंधळी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी सुरेश पवार, तर उपाध्यक्षपदी संतोष काळे यांची बिनविरोध निवड झाली. स्वीकृत संचालकपदी आप्पा गोरे यांची निवड करण्यात आली.
अध्यक्ष दादासाहेब काळे, उपाध्यक्ष संजय भोसले यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. या वेळी अध्यक्ष पदासाठी सुरेश पवार व उपाध्यक्षपदासाठी संतोष काळे यांचेच अर्ज आले. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, स्वीकृत संचालक, तसेच पंचायत समिती सदस्य बाळकृष्ण कदम यांचा आंधळी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी पंचायत समिती सदस्य अर्जुन काळे, सरपंच दादासाहेब काळे, शिवाजी काळे, किशोर खरात, बापूराव सस्ते, अजित जगताप, शेखर जाधव, ताराचंद जगताप, हनुमंत जगताप, शेखर काळे, राहुल काळे, सोसायटी संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
B07266
आंधळी : सुरेश पवार, संतोष काळे, आप्पा गोरे, बाळकृष्ण कदम यांच्या सत्कारप्रसंगी अर्जुन काळे, दादासाहेब काळे व मान्यवर. (रूपेश कदम : सकाळ छायाचित्रसेवा)
............................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.