Pune News 
पुणे

Pune News : प्रशासन जीव गेल्यावर जागे होणार का ?;महादेवनगरमधील पार्किंगबाबत संतप्त प्रवाशांचा सवाल

महादेवनगर - मांजरी रस्त्यावरील बेकायदा पार्किंग बाबत प्रशासन अजूनही हातावर हात ठेवून बसलेले आहे. कार्यकर्त्यांनी मागणी करीत पार्किंग नियोजनाची तयारी दाखवूनही प्रशासन मात्र त्यावर निर्णय घेण्यात उदासीनता दाखवत आहे. दिवसेंदिवस रस्त्यावरील वाहतूक वाढत असून प्रवाशांना कोंडी व छोट्या-मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे.

कृष्णकांत कोबल

मांजरी : महादेवनगर - मांजरी रस्त्यावरील बेकायदा पार्किंग बाबत प्रशासन अजूनही हातावर हात ठेवून बसलेले आहे. कार्यकर्त्यांनी मागणी करीत पार्किंग नियोजनाची तयारी दाखवूनही प्रशासन मात्र त्यावर निर्णय घेण्यात उदासीनता दाखवत आहे. दिवसेंदिवस रस्त्यावरील वाहतूक वाढत असून प्रवाशांना कोंडी व छोट्या-मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे. आता काही जीव गमावल्यावर प्रशासन जागे होणार काय, असा संतप्त सवाल प्रवासी व नागरिकांकडून केला जात आहे.

महादेव नगर मांजरी रस्त्याचे काँक्रिटीकरण व रुंदीकरणानंतर या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे दोन किलोमीटर पर्यंत वाहने पार्किंग केली जात आहेत. दुचाकीपासून अवजड वाहनापर्यंतची सर्व प्रकारची वाहने रात्रंदिवस आळीपाळीने येथे उभी असतात. त्यामुळे रस्ता रुंद होऊनही वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. प्रशासनाचा धाक न राहिल्याने रस्ता वाहतुकीत मोठे अडथळे निर्माण होत आहेत. पादचारी, ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी यांना जीव मुठीत घेऊन मार्ग काढावा लागत आहे. चौरंग स्मितशिल्प सोसायटी समोरील रस्ताही सार्वजनिक बांधकाम विभागाच्याच ताब्यात आहे. मात्र, त्याठिकाणच्या रस्त्यावरील अनाधिकृत पार्क केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई केली जाते. तशी कोणतीही कारवाई किंवा पार्किंग नियोजन त्यापुढील रस्त्यावर होत नाही. अशी तक्रार भानुदास म्हस्के, दत्तात्रय शिंगोटे, सचिन टकले, अनील काळे, संदीप घुले, दीपक घुले, किरण विभूते, शैलेश बडदे, गणेश घुले आदींनी केली आहे.

गेल्या महिन्यात सकाळने या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वाहतूक पोलिस निरीक्षक सुनील बोत्रे यांनी "कार्यकर्ते व नागरिकांनी प्रस्ताव दिल्यास पार्किंग बाबत कार्यवाही करता येईल,' असे सांगितले होते. तथापि त्याही अगोदर काही महिने कार्यकर्ते अजित घुले यांनी पार्किंग बाबत पत्रव्यवहार केला होता, याशिवाय एक महिन्यापूर्वी पुन्हा एकदा त्यांनी नागरिकांच्या सह वाहतूक पोलिसांना पत्र दिले आहे.

"महादेवनगर - मांजरी रस्ता दोन्हीही बाजूने होत असलेल्या पार्किंगमुळे अरूंद झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावर सतत वाहतुककोंडी होऊ लागली आहे. येथे सम - विषम तारखेनुसार पार्किंगचे नियोजन होणे आवश्यक आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांना दोन वेळा नागरिकांच्या सह्यांचे निवेदन दिले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका व पोलिस प्रशासनाने समन्वय साधून लवकरात लवकर येथील पार्किंगचा प्रश्न सोडवावा अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही.'

अजित घुले

प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

हा रस्ता अद्याप सार्वजनिक बांधकाम खात्याकडून पालिकेकडे वर्ग झालेला नाही. त्यामुळे सध्या त्यावरील पार्किंगबाबत नियोजन करता येत नाही. कार्यकर्ते किंवा नागरिकांनी पालिकेकडे प्रस्ताव दिल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाशी बोलून निर्णय घेता येईल.'

प्रवीण येळे

उप अभियंता, पथविभाग, महानगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT