SGW26B09436
सांगोला : येथील फॅबटेक कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाची सुरवात करताना तहसीलदार बाळूताई भागवत, नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे, संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, डॉ. संजय आदाटे व इतर.
प्रत्येक अपयश एक नवीन शिकवण देऊन जाते
तहसीलदार बाळूताई भागवत; फॅबटेक कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन
सांगोला, ता. ९ : आपल्या आयुष्यातील पहिला गुरू आई असते. अपयश ही प्रगतीची पहिली पायरी असून इतिहासातील अनेक महान व्यक्तींनी अपयशातून धडा घेत मोठे यश मिळवले आहे. आयुष्यात पराभव झाला म्हणून खचून न जाता प्रामाणिक कष्ट करत राहिल्यास अपयशदेखील नवी शिकवण देऊन जाते, असे प्रतिपादन तहसीलदार बाळूताई भागवत यांनी केले.
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च येथे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाची सुरवात सरस्वती, गणपतराव देशमुख व बिरासाहेब रूपनर यांच्या प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे, संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सुरेखा रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, प्राचार्य डॉ. रवींद्र शेंडगे, उपप्राचार्या डॉ. विद्याराणी क्षीरसागर, पॉलिटेक्निकचे प्राचार्य तानाजी बुरूंगले, स्कूलचे प्राचार्य सिकंदर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. सांगोला सारख्या ठिकाणी आधुनिक व गुणवत्तापूर्ण शिक्षण देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फॅबटेक संस्था कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ‘नक्षत्र २के२६’ या सांस्कृतिक उपक्रमांतर्गत ट्रॅडिशनल डे, फिशपॉट, ग्रुप डान्स, गायन, लावणी, नाटक, देवीचे जागरगीत, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची आरती अशा विविध कलाविष्कारांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. या सादरीकरणांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक विभागप्रमुख राहुल पाटील, स्टुडंट डीन डॉ. संजय पवार, अॅकॅडमिक डीन डॉ. अनुप विभूते, विद्यार्थिनी कुमारी कुमुद भडकवाड तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रा. प्रियांका पावसकर व प्रा. जयश्री मदने यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.