पुणे

"एपीजी लर्निंग'तर्फे एक हजार तरुणांना नोकरीची संधी 

सकाळवृत्तसेवा

पुणे : विविध शैक्षणिक शाखेच्या तब्बल एक हजार तरुणांना 40 बहुउद्देशीय कंपन्यांमध्ये "एपीजी लर्निंग'तर्फे "राइज जॉब फेअर फेब्रुवारी 2019' च्या माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यांना सरासरी 5 लाख ते साडेआठ लाखापर्यंतचे वार्षिक उत्पन्न मिळणार आहे. पुणे स्थानकाजवळील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या माहिती-तंत्रज्ञान महाविद्यालयात (एआयएसएसएमएस) आयोजित केलेल्या या फेअरमध्ये राज्यभरातून 3 हजार 500 हून अधिक विद्यार्थी मुलाखतीसाठी आले होते.

"एपीजी लर्निंग'च्या माध्यमातून विविध कंपन्या आणि तरुणांना एकाच ठिकाणी बोलावून नोकरीसाठी मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. या "राइज जॉब फेअर'मध्ये टेक महिंद्रा, इन्फोसिस, झेनकॉन इन्फोटेक प्रा. लि., जस्ट डायल, टीएटो, विजया मॅनेजमेंट, मारुती सुझुकी (एनटीआय), हिंदुजा ग्लोबल सर्व्हिसेस, टाटा टेल सर्व्हिसेस चॅनल पार्टनर्स, आयटी क्‍यूब, कॉग्नीझंट, टेलपरफॉर्मन्स (डीआयबीएस) आदी 40 बहुउद्देशीय कंपन्या सहभागी झाल्या. 

या वेळी एपीजी लर्निंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास सिंग, "एआयएसएसएमएस'च्या माहिती-तंत्रज्ञान महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप माने, टीएटो कंपनीच्या मनुष्यबळ विकास विभागाच्या प्रमुख अवंतिका भारद्वाज आदी उपस्थित होते.

सिंग म्हणाले, ""एकाच वेळी एवढ्या संधी कुठल्याही महाविद्यालयात येत नाहीत; परंतु आमच्यावर विश्‍वास ठेवून या सर्व कंपन्या येत आहेत, ही खूप मोठी गोष्ट आहे. फेब्रुवारीमध्ये पहिल्यांदाच "राइज जॉब फेअर'ला सुरवात केली. यामध्ये "राइज' ही आमची थीम आहे. त्यानुसार पहिल्यांदा माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित कंपन्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. पुढील काळात दर तीन महिन्यांनी वाणिज्य, आर्थिक, सेवा क्षेत्राशी संबंधित एक किंवा दोन उद्योग समूहांवर लक्ष केंद्रित करून नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या जाणार आहेत.'' 

भारद्वाज म्हणाल्या, ""विद्यार्थ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार नोकरी निवडण्याची संधी या उपक्रमातून मिळते. कपंन्यांना यातून खरंच ज्यांच्यामध्ये क्षमता आहे असे तरुण मिळतात.'' 

डॉ. माने म्हणाले, ""ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील विद्यार्थ्यांना अशा अनेक संधी उपलब्ध होतात. "एपीजी लर्निंग'च्या या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होईल.'' 


 ''हा उपक्रम सर्वांसाठीच चांगला आहे. जिथे एकाच वेळी तरुणांना कंपनी आणि कंपनीला वेगवेगळे तरुण निवडण्याची संधी आहे. अन्यथा, कुठल्या कंपनीत नोकरी आहे, याचा शोध घेत तरुणांना भटकंती करावी लागते.''
- भूपेश कुंभार, व्यवस्थापकीय संचालक, झेनकॉन इन्फोटेक प्रा. लि. 

''माझ्या माहितीमधील हा अतिशय वेगळा आणि चांगला प्रयत्न आहे. आमच्या कंपनीत 200 जागा भरायच्या आहेत. इथे आलेल्या तरुणांची संख्याही अधिक असल्याने आम्हाला तेवढे कामगार मिळतील. 
- जान्मेजॉय महातो, टेक महिंद्रा 


''वर्तमानपत्रात बातमी वाचून आले होते. एकाच ठिकाणी असल्यामुळे दोन कंपन्यांच्या मुलाखती देता आल्या. एरवी एवढ्या कंपन्यांची माहिती मिळवणे किती अवघड झाले असते. यातून जिथे मिळेल तिथे नोकरी करायची.''
- प्रियांका आदक, विद्यार्थिनी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

International Firefighters' Day 2024: एक दिवस खऱ्या सुपरहीरोंसाठी! आज साजरा केला जातो 'फायर फायटर डे'; कशी झाली सुरूवात?

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SCROLL FOR NEXT