Elecation  sakal
पुणे

Pune : दापोडे विविध सोसायटी संचालक मंडळ बरखास्त

दापोडे सोसायटीच्या गैरकारभारा बाबत काँग्रेसचे माजी उपसभापती चंद्रकांत शेंडकर यांचे चिरंजीवसंतोष शेंडकर, प्रकाश शेंडकर,शंकर शेंडकर आदी शेतकऱ्यांनी सहकार विभागाकडे तक्रार केली होती.

मनोज कुंभार-वेल्हे

दापोडे - कामात अनियमितता,नियमबाह्य कामकाजाचा ठपका ठेवून दापोडे विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आल्याचा आदेश वेल्ह्याच्या सहाय्यक निबंधक रूपाली माने यांनी काढले आहेत. याबाबत तक्रारदार शेतकरी संतोष शेंडकर यांनी याबाबत हि माहिती दिली.

दापोडे सोसायटीच्या गैरकारभारा बाबत काँग्रेसचे माजी उपसभापती चंद्रकांत शेंडकर यांचे चिरंजीवसंतोष शेंडकर, प्रकाश शेंडकर,शंकर शेंडकर आदी शेतकऱ्यांनी सहकार विभागाकडे तक्रार केली होती.

त्याची दखल घेत वेल्हे तालुका सहाय्यक निबंधक रुपाली माने व तपासणी अधिकारी पी. एम. तमनर यांनी सोसायटीच्या कामकाजाची तपासणी केली.

त्यात संस्थेच्या कामकाजात अनेक त्रुटी आढळल्या.संस्थेचे कामकाज नियम आणि संस्थेच्या उपविधी यांच्या तरतुदीनुसार योग्य रीतीने अनुपालन करीत नसल्याचे तसेचसंस्थेचे अभिलेख आणि लेखापुस्तके योग्य नमुन्यात ठेवली नसल्याचे व संस्था कारभार सुयोग्य व्यापारी तत्त्वानुसार चालवला जात नसून अनियमिता अढळली असा ठपका ठेवत

राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार संस्थेचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून कामकाज पाहण्यासाठी सहा महिन्यासाठी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सहाय्यक निबंधक रुपाली माने यांनी सांगितले.

सहाय्यक निबंधक कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक पी ‌.एम. तमनर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.तमनर म्हणाले, सहकार विभागाच्या नियमानुसार संचालक मंडळ बरखास्त करण्यात आहे.

वेल्हे तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज शेंडकर म्हणाले,सर्व शेतकऱ्यांच्या हितासाठी सोसायटीचे कामकाज होणे अपेक्षित असताना ज्या पद्धतीने दापोडे विविध कार्यकारी सोसायटीमध्ये नियमानुसार काम होत नव्हते.

अशा तालुक्यातील अनेक सोसायट्यांमध्ये परिस्थिती असून शेतकऱ्यांची मोठी पिळवणूक झालेली आहे याबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी काम करणार आहे.

तर दापोडे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दशरथ धर्माजी मरळ म्हणाले ,'दापोडे सोसायटीमध्ये एकही रुपयाचा भ्रष्टाचार झाला नसून केलेले आरोप हे सर्व राजकीय सूडबुद्धीने केलेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT