APMC Election Result esakal
पुणे

APMC Election Result: मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व

रुपेश नामदास

वडगाव मावळ, ता.२९: मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून आत्तापर्यंत कृषी पतसंस्था मतदार संघातील सर्वसाधारण असलेल्या सात व महिला मतदार संघातील दोन अशा नऊ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलचे उमेदवार विजयी झाले आहेत.

मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक शुक्रवारी झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीचे सहकार पॅनेल व भाजप प्रणित छत्रपती शिवाजी महाराज सर्वपक्षीय सहकार परिवर्तन पॅनेल या दोन पॅनेलमध्ये चुरशीची लढत झाल्याने निकाला बाबत मोठी उत्सुकता होती.

मतमोजणीला निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजीराव घुले यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सकाळी नऊ वाजता येथील पंचायत समितीच्या सभागृहात सुरूवात झाली होती. सुरुवातीला कृषी पतसंस्था मतदार संघातील सर्वसाधारण असलेल्या सात जागांची मतमोजणी करण्यात आली. या सातही जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला.

त्यानंतर महिला मतदार संघातील दोन जागांची मतमोजणी झाली. त्या दोन्ही जागांवर महाविकास आघाडीच्याच उमेदवारांनी बाजी मारली. आत्तापर्यंत मोजणी झालेल्या बाजार समितीच्या १८ जागांपैकी निम्म्या म्हणजे नऊ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. निकालाचा कल हाती येताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT