Appointment of 20 people on Pune District Planning Committee by government esakal
पुणे

Pune News : पुणे जिल्हा नियोजन समितीवर सरकारतर्फे २० जणांची नियुक्ती

तापकीर, कुल, भेगडे, बीडकर, टिळेकर, पाटील यांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य सरकारने पुणे जिल्हा नियोजन समितीवरील नामनिर्देशित आणि विशेष निमंत्रित मिळून एकूण २० सदस्यांची मंगळवारी (ता.१७) नियुक्ती केली आहे. नवनियुक्त २० सदस्यांमध्ये विधानसभा किंवा विधानपरिषद किंवा संसद सदस्यांमधून निवडण्यात येणाऱ्या दोन, जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेल्या चार अशा एकूण सहा नामनिर्देशित तर, अन्य १४ विशेष निमंत्रित सदस्य आहेत.

नामनिर्देशित सदस्यांमध्ये आमदार भीमराव तापकीर, राहुल कुल,माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पुणे महानगरपालिकेतील माजी सभागृह नेते गणेश बीडकर आदी सदस्यांचा समावेश आहे.

विशेष निमंत्रित १४ सदस्यांमध्ये भगवान नारायण पोखरकर (वराळे, ता. खेड), माजी मंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे (तळेगाव दाभाडे, ता. मावळ), वासुदेव काळे ((दौंड), आशा बुचके (पारुंडे, ता. जुन्नर),राहुल बाबूराव पाचर्णे (बाबुरावनगर, ता. शिरूर), जीवन कोंडे (केळवडे, ता. भोर), पांडुरंग कचरे (काटेवाडी, ता. बारामती), विजय फुगे (भोसरी, ता. हवेली),

काळुराम नढे (काळेवाडी, ता. हवेली), प्रवीण काळभोर (कदमवाकवस्ती, ता. हवेली), योगेश टिळेकर (कोंढवा बुद्रूक, पुणे शहर), शरद हुलावळे (कार्ला, ता. मावळ), अलंकार कांचन (उरुळीकांचन, ता. हवेली) आणि अमोल पांगारे (वेळू, ता. भोर) आदींचा समावेश आहे.

पुणे जिल्हा नियोजन समितीवर याआधी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने नामनिर्देशित आणि विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. दरम्यान जून २०२२ च्या अखेरीस महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि राज्यात भाजप व बाळासाहेबांची शिवसेना या दोन पक्षांचे संयुक्त सरकार सत्तेवर आले.

या नवीन सरकारने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केलेल्या जिल्हा नियोजन समिती सदस्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या होत्या. यामुळे मागील सुमारे सहा महिन्यांपासून जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित आणि विशेष निमंत्रित सदस्यांच्या जागा रिक्त होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT