पुणे

मतिमंद विशेष मुलांचे स्नेहसंमेलन उत्साहात

CD

भुईंजला सशक्त अभिनयाने मने जिंकली

सह्याद्री शिक्षण संस्थेच्या आपुलकी शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

भुईंज, ता. १८ : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित आपुलकी मतिमंद विशेष मुलांच्या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. विद्यार्थ्यांच्या सशक्त अभिनयाने व भावस्पर्शी सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी भूषविले. यावेळी जिल्हा परिषदेच्या दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी ललिता शेळके, संस्थेचे संस्थापक अनिल पवार, संस्थापक संचालिका सुषमा पवार, साहेबराव पडवळ, पाचवडचे सरपंच महेश गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक पतंग पाटील, आसलेच्या सरपंच सुप्रभा चव्हाण, अमृतवाडीचे सरपंच सचिन रत्नपारखे, प्रकाश काटवटे, मानसिंग चव्हाण, पोलिस पाटील आरती मोरे, उद्योजक लतीफ पटेल, सुजाता धर्माधिकारी आदी उपस्थित होते.
श्री. दोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी मुलांनी बनवलेली फोटो फ्रेम पाहून कौतुक केले.
सुषमा पवार यांनी शैक्षणिक व क्रीडा क्षेत्राची यशस्वी वाटचाल व विविध उपक्रम यांची माहिती दिली.
सई सोशल इंटिग्रेशन अंतर्गत सर्वसामान्य मुलांना या कार्यक्रमाचे व्यासपीठ मिळवून दिल्याची माहिती दिली. विविधतेतून एकता दर्शविणारी ‘एक राष्ट्र, एक रंगमंच, अनेक संस्कृती दर्शन’ ही संकल्पना ठेवून ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ म्हणत विद्यालयाने यावर्षी स्नेहसंमेलनाद्वारे देशातील विविध राज्यांचे सण समारंभ, वेशभूषा यांचे दर्शन रंगमंचावर घडविले.
शंभू वंदना, रावण, घुमर, लावणीच्या सादरीकरणाने बालकलाकारांच्या सशक्त अभिनयाचे दर्शन घडविले, तर लाठीकाठी, तलवारबाजी प्रात्यक्षिकाद्वारे महिला स्वसंरक्षणाचा संदेश देण्यात आला. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे सादरीकरण करून सर्व पालक, प्रेक्षकांची मने जिंकली.
यावेळी अविनाश निकम, अनिल चव्हाण, आनंदराव गायकवाड यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक, उद्योग, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, पालक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी महेश ढगे, सचिन गायकवाड, विद्या शिंगटे, वैशाली माने, ऊर्मिला महामुनी, किरण, खुडे यांच्यासह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. नलिनी गायकवाड- चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.
--------------------------------
01425
भुईंज ः आपुलकी शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी तुषार दोशी, ललिता शेळके, अनिल पवार, सुषमा पवार, साहेबराव पडवळ आदी.
------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Statement : खैमेनींच्या माघारी इराणचे प्रमुख खतीबजादेह यांची जबाबदारी, शेवटची गोळीपर्यंत लढण्याचा केला निर्धार, युद्ध आणखी पेटणार

Gold Rate Today: आज सोन्याच्या भावात मोठा बदल! एक तोळा सोन्याचा भाव किती? जाणून घ्या ताजा भाव

Axar Patel: अहमदाबादमध्ये सामना? मैं हूँ ना ! अंतिम सामन्याबाबत अक्षर पटेलकडून निर्धास्त राहण्याचा दिलासा

Latest Marathi News Live Update : कामठीत मोकाट कुत्र्यांचा कहर, एका दिवसात १४ नागरिकांना चावा

Success Story: गिरवीचा विशाल वाघ ठरला राज्यात अव्‍वल; पोलिस उपनिरीक्षकपदी निवड, सर्व स्तरांतून होतेय कौतुक

SCROLL FOR NEXT