Manorama dilip khedkar 
पुणे

Pooja Khedkar: पूजा खेडकरच्या आई-वडिलांचा खरंच घटस्फोट झालाय का? पोलिसांनी केंद्राला पाठवलेल्या अहवालात काय सांगितलं?

IAS Pooja Khedkar parents Manorama dilip khedkar really divorced: खेडकर कुटुंबाच्या संबंधित व्यक्तीसह अनेक व्यक्तींचे जबाब नोंदवत पोलिसांनी हा अहवाल केंद्र शासनाला पाठवला आहे.

कार्तिक पुजारी

Pune News: प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरच्या आई वडिलांचा घटस्फोटाचा अहवाल पुणे पोलिसांनी केंद्र सरकारने पाठवला असल्याची माहिती मिळत आहे. खेडकर कुटुंबाच्या संबंधित व्यक्तीसह अनेक व्यक्तींचे जबाब नोंदवत पोलिसांनी हा अहवाल केंद्र शासनाला पाठवला आहे.

खेडकर दाम्पत्याचा घटस्फोट 2010 मध्ये झाला असला तरी त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित करणारे आहेत. सगळ्या बाबींचा तपास आणि चौकशी करून पोलिसांनी हा अहवाल केंद्राकडे पाठवला आहे.⁠केंद्राने राज्य सरकारला खेडकर दाम्पत्याचा घटस्फोट झालाय का याबाबतचा सविस्तर अहवाल मागवला होता.⁠ केंद्र सरकारच्या सूचनेनंतर आता पोलिसांनी हा अहवाल केंद्राकडे पाठवलेला आहे.

⁠घटस्फोटानंतर मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांचे वागणे संशयास्पद असल्याचे समोर आले आहे. ⁠पूजा खेडकर हिच्या कुटुंबाचे उत्पन्न आठ लाखाच्या आत दाखवण्यात आले आहे. त्यामुळे तिने नॉन क्रिमीलेयर सर्टिफिकेटचा लाभ घेतला होता. परंतु पूजाचे वडील हे वर्ग-अ अधिकारी होते. असे असताना त्यांची उत्पन्न कमी कसे, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता. या प्रमाणपत्राच्या अनुषंगाने तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याचे आयोगाला सांगत नोकरी मिळवली होती.

पूजा खेडकर हिने प्रशासकीय सेवेत रुजू होताना नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेटचा लाभ घेतला आहे. मात्र, तिचे वडील प्रशासकीय अधिकारी होते. त्यामुळे तिने नॉन क्रिमीलेअरचा लाभ का घेतला असा प्रश्न निर्माण होत होता. शिवाय, एका व्हिडिओमध्ये पूजा खेडकर म्हणताना दिसतेय की, तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला आहे. त्यामुळे खरंच त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला आहे का? असा प्रश्न विचारला जात होता.

पूजा खेडकर सध्या अडचणीत सापडली आहे. तिला पुण्यात हजर होण्याचे निर्देश देण्यात आले होते. पण, सध्या ती नॉट रिचेबल आहे. या प्रकरणात नव-नवे खुलासे समोर येत आहेत. त्यामुळे पूजा खेडकरचे पाय खोलात जात असल्याचं दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT