3arrested_54.jpg
3arrested_54.jpg 
पुणे

गॅस गोडाऊनमध्ये डांबून तरुणास मारहाण करणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मित्रांना मारल्याच्या रागातून एका तरुणाचे अपहरण करुन त्यास गॅसच्या गोडाऊनमध्ये डांबून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाने ही कारवाई केली. अटक केलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या नावावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ही घटना सात जुनला मार्केटयार्ड परिसरात घडली होती. 

गोट्या उर्फ अजय भागप्पा मुळे (वय 26, रा. आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. आतिष स्वामी पवार (वय 30.रा. मार्केट यार्ड) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतिष व गोट्या यांची एकमेकांशी ओळख आहे. आतिषने किरकोळ कारणावरुन गोट्याच्या काही मित्रांना मारहाण केली होती. हा प्रकार मित्रांनी गोट्याला सांगितला. या रागातून गोट्या व त्याच्या मित्रांनी मिळून आतिषला सात जुनला उचलून नेले. त्यानंतर त्यास मार्केटयार्ड परिसरातील एका गॅस गोडाऊनमध्ये डांबुन ठेवले. त्यानंतर त्यास जबर मारहाण केली. 

दरम्यान, आतिषच्या मित्रांनी पोलिसांच्या मदतीने आतिषची सुटका केली. त्यानंतर गोट्या व त्याच्या मित्रांविरुद्ध मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर गोट्या व त्याचे मित्र फरारी झाले होते. या प्रकरणातील आरोपी गोट्या हा मार्केटयार्ड परिसरातील बैलबाजार परिसरात आला असल्याची खबर युनीट एकचे पोलिस कर्मचारी अमोल पवार यांना मिळाली. त्यानुसार, सहाय्यक पोलिस आयुक्त समीर शेख, पोलिस निरीक्षक अरुण वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिनेश पाटील, पोलिस कर्मचारी पवार, अनिल घाडगे, अजय थोरात, बाबा चव्हाण, वैभव स्वामी यांच्या पथकाने गोट्याला सापळा रचून अटक केली.


आरोपी गोट्या मुळे यांच्याविरुद्ध खंडणी, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, मारामारी, शस्त्र बाळगणे या स्वरुपाचे दहाहून अधिक गुन्हे दाखल आहेत. याबरोबरच त्यांच्यावर पुणे पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा नियंत्रण कायद्यान्वये (एमपीडीए) मागील वर्षी कारवाई केली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT