Crime News
Crime News Sakal
पुणे

पुणे : इन्स्टाग्रामवर तरुणीचे बनावट खाते बनवून बदनामी करणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा

कंपनीमध्ये काम करणाऱ्या सहकारी तरुणीचे इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करुन त्याद्वारे नातेवाईकांना आक्षेपार्ह मेसेज पाठवून तरुणीची बदनामी करणाऱ्यास सायबर पोलिसांनी अटक केली.

पुणे - कंपनीमध्ये काम करणाऱ्या सहकारी तरुणीचे (Girl) इन्स्टाग्रामवर (Instagram) बनावट खाते (Bogus Account) तयार करुन त्याद्वारे नातेवाईकांना आक्षेपार्ह मेसेज (Offensive Message) पाठवून तरुणीची बदनामी करणाऱ्यास सायबर पोलिसांनी (Cyber Police) अटक केली. तरुणाविरुद्ध बदनामीसह विनयभंगाचा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

जयमीन रितेश चावडा (वय 23, रा. बेलकेनगर, कोथरुड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हि घटना 9 व 10 फेब्रुवारी रोजी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी एका नामांकीत कंपनीत काम करत आहे. तरुणी व चावडा एकाच कंपनीत काम करीत आहेत.

दरम्यान, चावडा याने तरुणीच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार केले. इलेक्‍ट्रॉनिक माध्यमातून तरुणीचा पाठलाग करुन तिची बदनामी होईल, अशा पद्धतीने अश्‍लिल व आक्षेपार्ह मेसेज बनावट इन्स्टाग्राम खात्यावरुन फिर्यादीच्या नातेवाईकांना पाठविले. या प्रकारामुळे नातेवाईकांमध्ये फिर्यादी तरुणीबाबत गैरसमज निर्माण होऊ लागले होते. हा प्रकार फिर्यादीला समजल्यानंतर त्यांनी याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार केली. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर संबंधित प्रकार हा फिर्यादीच्या कार्यालयात काम करणारा जयमीन चावडा हा तरुण करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार, पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बदनामी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT