Crime
Crime 
पुणे

लष्करी जवान असल्याचे सांगून ओएलएक्‍सद्वारे फसवणूक करणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ओएलएक्‍सवर जाहीरात केलेल्या नागरीकांचे मोबाईल घेण्याच्या बहाण्याने त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या तोताया लष्करी जवानास गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाने अटक केली. मागील काही महिन्यांपासून नागरीकांना लष्करातील जवान असल्याचे भासवून पुण्यासह नगर येथील नागरीकांची फसवणूक केल्याची माहिती पुढे आली आहे. 

राहूल अरुण सिद्धु (वय 42, रा. ससाणेनगर, हडपसर) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. वारजे माळवाडी येथे राहणाऱ्या ऋ्रषीकेश सोमासे यांनी त्यांचा जुना मोबाईल विक्री करण्यासाठी ओएलएक्‍सवर त्याची जाहीरात केली. त्यावेळी त्यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्याने स्वतःचे नाव राहूल सिद्धू असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना मोबाईल घेऊन घोरपडी गावातील युद्ध स्माकाजवळ बोलाविले. त्यानंतर फिर्यादी यांना आपण लष्करामध्ये जवान असून आपल्याला लगेच जायचे असल्याचे सांगून फिर्यादी यांना धनादेश दिला. दरम्यान, फिर्यादी यांनी बॅंकेमध्ये भरलेला धनादेश वटला नाही.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी हडपसर येथील ससाणेनगर येथे असल्याची खबर पोलिस कर्मचारी अमोल पवार यांना मिळाली.

त्यानुसार, गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाने घटनास्थळी सापळा रचून त्यास अटक केली. त्यावेळी त्याने आपणच लष्करी जवान असल्याचे खोटे सांगून फसवणूक केल्याचे सांगितले. तसेच याच पद्धतीने नगरमधील भिंगार, तोफखाना, नेवासा, शिर्डी, एमआयडीसी पोलिस ठाण्यात सात गुन्हे दाखल आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT