1kidnap_0.jpg
1kidnap_0.jpg 
पुणे

खंडणीसाठी अपहरण करून दुकानदाराला जीवे मारण्याची धमकी

सकाळवृत्तसेवा

पुणे : खंडणीस नकार देणाऱ्या किराणा माल दुकानदाराचे अपहरण करून कोयत्याचा धाक दाखवून दुकानदाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री आठ वाजता फुरसुंगी येथे घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकास अटक केली आहे. 

गणेश दिलीप मोडक (वय 24, रा. वडकी, हवेली) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह आणखी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भेकराईनगर येथील 26 वर्षीय दुकानदाराने फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे फुरसुंगीमधील भेकराईनगर येथे किराणाला मालाचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीची तोंडओळख असलेल्या गणेश मोडक व त्याच्या साथीदाराने फिर्यादी दुकानाबाहेर बोलाविले. त्यानंतर मोडकने फिर्यादी एक लाख रुपयांची मागणी केली. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यास पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी मोडकने त्याच्याकडील पाण्यासारखा पदार्थ फिर्यादीच्या तोंडावर टाकला. त्यानंतर फिर्यादीच्या पाठीवर कोयला उलटा मारून फिर्यादी एका लाल रंगाच्या कारमध्ये बसविले. त्यानंतर फुरसुंगीच्या पुढे मोकळ्या जागेत नेऊन मोडकने फिर्यादीच्या गळ्याला कोयता लावून पुन्हा एकदा दर महिन्याला एक लाख रुपयांची खंडणी देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी शिवीगाळ करत त्यांच्या खिशातील पाच हजार रुपयांची रक्कम काढून घेतली. त्यानंतर एक दिवस फिर्यादी त्यांच्या गाडीत कोंडून ठेवले. त्यानंतर त्यांची सुटका केली.
 

दरम्यान, फिर्यादी यांनी हा प्रकार फुरसुंगीतील अन्य किराणा मालाच्या दुकानदारांना सांगितला. त्यानंतर सगळ्यांनी चर्चा करून याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे ठरविले. त्यानंतर पोलिसांनी मोडक यास अटक केली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक के.एस.लोंढे करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : नरेश म्हस्केंच्या उमेदवारीमुळे भाजप नाराज? पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

SCROLL FOR NEXT