Dasara-Purchasing 
पुणे

कोरोनाचे सीमोल्लंघन करण्याची हीच वेळ!

संभाजी पाटील@psambhajisakal

दसरा हा सकारात्मक ऊर्जा देणारा सण. मात्र, सात महिन्यांपासून आपण ज्या भीषण संकटाचा सामना करत आहोत; त्या कोरोनाची तीव्रता बऱ्याच अंशी कमी झाली आहे. आता याच काळात आपण खरोखर काळजी घेतली, तर कोरोनाची दुसरी लाट आपण थोपवू शकतो. तसेच, कोरोनाचे कायमचे सीमोल्लंघनही करता येणे शक्‍य आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फ्रान्सचे पंतप्रधान जीन कॅस्टेक्‍स यांनी फ्रान्समध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याचे जाहीर करून देशाच्या ३८ भागांमध्ये सहा आठवड्यांची संचारबंदी जाहीर केली. फ्रान्ससह युरोपातील अमेरिका, इटली आदी देशांमध्ये कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. भारतातही पुढील महिन्यात अशी लाट येण्याची शक्‍यता वर्तविली आहे. सध्यातरी आपल्याकडे रुग्णांची संख्या बरीच कमी होत आहे. पुण्यात दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या दोन हजारांवरून पाचशेच्या आत आली आहे. पुण्यात चाचण्या कमी केल्या असल्या, तरीही नवे रुग्ण आढळण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.

उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १९ हजारांवरून सात हजारांवर आली आहे. ही नक्कीच चांगली बाब आहे. जगात दुसरी लाट आलेली असताना आपल्याला कोरोनाला हद्दपार करण्याची संधी मिळाली आहे, त्याचा फायदा आपण उठवायला हवा. 

शहरातील लॉकडाउनचे सर्व निर्बंध जवळजवळ उठविले आहेत. चित्रपटगृहे, मंदिरे वगळता सर्व गोष्टी आता सुरू झाल्या आहेत. त्यातच दसरा-दिवाळी यांसारखे वर्षातील सर्वांत मोठे सण आले आहेत. त्यामुळे साहजिकच रस्त्यावरील, दुकानांमधील, सार्वजनिक ठिकाणांवरील गर्दी वाढणार आहे. याचा वापर कोरोना पसरण्यासाठी नाही तर थोपविण्यासाठी केला तर नक्कीच उरलासुरला कोरोनाही आपल्याला पळवून लावणे शक्‍य होईल. कोरोना कमी होतोय, असे म्हटले की निष्काळजीपणा वाढण्याचा धोका आहे. आपण मास्क घातला नाही तर काय फरक पडणार? हा विचारही कोरोनाची संख्या वाढवायला कारणीभूत ठरू शकतो. 

गणेशोत्सवात झालेल्या चुका आता सणांच्या काळात होणार नाहीत, याची काळजी प्रत्येकानेच घ्यायला हवी. बाजारात येताना शक्‍यतो ज्येष्ठ नागरिक, मुलांनी टाळावे. दुकानदारांनी त्यांना घालून दिलेल्या नियमांचे पालन करायला हवे. त्याकडे महापालिका, पोलिसांनी कटाक्षाने लक्ष ठेवावे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून मास्क तोंडाखाली येण्याचे प्रमाण वाढले आहे. मास्कचा आग्रह घरापासूनच सर्वांनी धरायला हवा. जो वापरत नसेल, त्याला स्पष्टपणे सुनवायलाच हवे. जे रुग्ण आहेत आणि घरी उपचार घेत आहेत, त्यांनी कटाक्षाने आरोग्य विभागाने घालून दिलेली नियमावली पाळायलाच हवी. 
महापालिकेने सध्या चाचण्या कमी केल्या आहेत. पण, नागरिकांनी लक्षणे दिसताच स्वतःची चाचणी करून घ्यायलाच हवी. पालिकेचे चाचण्या कमी करण्याचे धोरण योग्य नाहीच. निदान ‘ट्रेसिंग’ तरी शास्त्रशुद्ध पद्धतीने करायला हवे. ते सध्या होताना दिसत नाही. रेल्वे, विमानातून प्रवास करून पुण्यात येणाऱ्यांची कडक तपासणी व्हायलाच हवी. सध्या ती होताना दिसत नाही. युरोपात आलेली लाट कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडे येणार नाही, याची यंत्रणा सज्ज ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. दसरा हा त्यासाठी सर्वांत चांगला मुहूर्त आहे. 

या गोष्टी अवश्‍य करा
१) मास्कचा कटाक्षाने वापर 
२) विमान, रेल्वे, एसटीतून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी
३) नव्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे ट्रेसिंग 
४) विनाकारण गर्दी करणे टाळा
५) दुसरी लाट न येण्यासाठी सर्व खबरदारी

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT