cow
cow 
पुणे

लंगडत चाललेल्या गाईसाठी जणू देवदूतच आला धावून 

रमेश वत्रे

केडगाव (पुणे) : दौंड तालुक्यातील चौफुला येथील गोशाळेत सोडून दिलेल्या अपंग गाईला संचेती हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनी कृत्रिम पाय बसविला. त्यामुळे गाय आता चालू लागली आहे. 

बोरमलनाथ देवस्थानच्या गोशाळेत दौंड येथील एका व्यक्तीने ही गाय सोडली आहे. या गाईचा पुढचा उजवा पाय अपघातात तुटला आहे. त्यामुळे तिला चालता येत नाही. गाय अपंग असल्याने तिची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. तिला चारा व पाणी जागेवर दिले जाते. या गोशाळेत गोमूत्र नेण्यासाठी आलेले अमर जगताप यांनी या गाईचा पाय पाहिला. त्यांनी संचेतीमधील सलील जैन यांच्याशी संपर्क केला. जैन यांनी लगेच होकार देऊन गाईच्या पायाचे माप घेण्यासाठी ते चौफुला येथे आले. रविवारी त्यांनी गाईचा पाय बनवून आणला. 

जैन हे दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम पाय बसवतात. प्राण्यांना कृत्रिम पाय बसविताना त्यांना विशेष समाधान वाटते. प्राण्यांना कृत्रिम पाय हा प्रकार या भागात तसा नवीनच आहे. सलिल यांचे वडील मेजर जनरल (निवृत्त) डॉ. सुशीलकुमार जैन हे लष्करात वैद्यकीय सेवा करीत असत. अपंग व्यक्ती व प्राण्यांना ते मदत करतात. त्यांचेच काम पाहत सलील हे सुद्धा गेली 36 वर्षे दिव्यांगांना मदत करीत आहे. संचेती हॉस्पिटल व साधू वासवानी मिशनच्या सहकार्याने त्यांची सामाजिक कार्ये चालू आहेत. कधी कधी पदरमोड करून जैन ही सेवा करतात. गोशाळेचे प्रमुख कैलास पुजारी यांनी जैन व जगताप यांचे आभार मानले. 

गाय आपली माता आहे. गाईला माझ्या हातून पाय बसविला हे माझे सौभाग्य आहे. या अगोदर गाढव, ससा, कुत्रा अशा अनेक प्राण्यांना कृत्रिम पाय बसविले आहेत. एका पक्षाला कृत्रिम चोचसुद्धा आम्ही बसवली आहे. पायाची फिटिंग बरोबर आहे की नाही हे पाहण्यासाठी मी पुढील काही आठवडे येथे येणार आहे. माझ्या वडिलांपासून प्रेरणा घेत मी हे काम करीत आहे. 
 - सलील जैन 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT