पुणे

अरुण कुसाळकर नेहमीच गोरगरिबांच्या सुखदुःखात

CD

चाकण, ता. ३ : ‘‘खेड तालुक्यातील मेदनकरवाडी गणातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अरुण कुसाळकर हे नेहमी गोरगरिबांच्या सुखदुःखात असतात. ते गोरगरिबांची कामे करतात. विद्यार्थ्यांसाठी, कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी झटतात. त्यामुळे त्यांना विजयी करा,’’ असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख रामदास धनवटे यांनी केले.
अरुण कुसाळकर यांच्या प्रचाराला मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे. या गणात आमदार बाबाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने प्रचार करत आहेत. कुसाळकर म्हणाले, ‘‘या गणात अनेक समस्या आहेत, त्या सोडविण्याचा मी प्रयत्न करणार आहे. या गणातील गोरगरिबांची, कामगारांची, महिला वर्गांची, विद्यार्थ्यांची, शेतकऱ्यांची कामे करत आलो आहे. विविध प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी मी वेळोवेळी प्रयत्न केला आहे. त्यामुळे गणातील कामगार वर्गाने, तसेच शेतकरी व महिलांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे.’’ रामदास धनवटे म्हणाले, ‘‘आम्ही नुसती आश्वासने देत नाही. या गणात अनेक प्रश्न आहेत, ते सोडविण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत व प्रयत्न करत राहू. मशाल या चिन्हावर मतदारांनी शिक्का मारून अरुण कुसाळकर यांना विजयी करावे.’’
मेदनकरवाडीचे सरपंच अमोल साळवे, मंगेश पऱ्हाड, ज्ञानेश्वर कड, श्‍यामराव कड, किरण कड, रामभाऊ कुसाळकर, प्रवीण मुंगसे, शशिकांत लष्करे, विलास मुंगसे, शुभम कड, पांडुरंगशेठ लष्करे, मयूर खांडेभराड, बजरंग कड, संतोष कड, ईश्वर कोतवाल, अनिल लष्करे, संदीप लष्करे, सागर कड, रामचंद्र कड आदी व इतर कार्यकर्ते, महिला, तरुण, तरुणी जोमाने प्रचार करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्ट संतापलं! आदेश न पाळणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा, उशिरा अपीलही चालणार नाही

Donald Trump : एपस्टीन फाईल्सचा दुसरा पार्ट! डोनाल्ड ट्रम्पनी १५ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याचा आरोप, अमेरिका सरकारने कागदपत्रे केली सार्वजनिक

Pune News : आशासेविका मानधनाविना; तब्बल दोन हजार महिलांना पाच महिन्यांपासून निधी नाही

Latest Marathi News Live Update : शेवटची गोळी आणि सैनिक असेपर्यंत आम्ही लढणार; इराणचे उपपरराष्ट्रमंत्री सईद खतीबजादेह यांचा ठाम निर्धार

Success Story: शेतकऱ्याच्या मुलाची भरारी; अजित देशमुख यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT