kiran Gosavi Sakal
पुणे

किरण गोसावी अखेर सापडला; पिंपरी-चिंचवडमध्ये असल्याची माहिती

काही माध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यानं प्रत्यक्ष संवाद साधला

Amit Ujagare (अमित उजागरे)

आर्यन खान केसमुळ चर्चेत आलेला एसीबीचा पंच आणि पुणे पोलिसांना हवा असलेला फरार आरोपी के. पी. गोसावी अर्थात किरण गोसावी अखेर सापडला आहे. पिंपरी-चिंचवडमधील रावेत येथे तो असल्याची माहिती साम टीव्हीच्या प्रतिनिधीनं दिली.

फरारी आरोपी असलेल्या किरण गोसावीला पकडण्यासाठी पुणे पोलीस काही दिवसांपासून प्रयत्न करीत होते. अखेर सोमवारी रात्री पुणे पोलिसांचे पथक गोसावीच्या मागावर उत्तर प्रदेशात दाखलही झाले. पोलिस लखनऊमध्ये पोचले, गोसावीपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर पोलिस पोचले, मात्र, गोसावी तेथून निसटण्यात यशस्वी झाला होता. पुणे पोलिसांची दोन पथकं गोसावीच्या मागावर आहेत. पण गोसावी पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत रावेत येथे आज संध्याकाळी दाखल झाला.

गोसावी माध्यमांशी काय बोलला?

एनसीबीच्या कारवाईनंतर आपल्याला सुरक्षितरित्या घेऊन जाण्यासाठी आर्यन खाननं मला विनंती केली होती. त्यामुळे मी त्याचा हात आपल्या हातात घेऊन त्याला धावत जात होतो. आता प्रभाकर साईल यानं यासंदर्भात गंभीर आरोप केल्यानंतर मला मीडियापुढं आणि कोर्टासमोर येऊन बोलणं गरजेचं बनलं होतं, त्यामुळं मी आलो आहे, असं गोसावी यांनं माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT